A shocking incident in Chhatrapati Sambhajinagar where a father was brutally murdered in front of his minor child.
Chhatrapati Sambhajinagar murder case shocks locals : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक थरकाप उडवणारी गुन्हेगारी घटना घडली आहे. मुंबई, पुण्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरातही गँगवॉरची घटना घडल्याने, खळबळ उडाली आहे. शहरातील सय्यद इम्रान शफिक या गुन्हेगारास त्याच्या भावंडांनी जीवे मारलं आहे. ही हत्या एवढ्या निघृण पद्धतीने केली गेली, की तिचे वर्णन ऐकूनही अंगावर शहारे येत आहेत.
हल्लेखोरांनी सय्यद इम्रान सय्यद शफिक याला मारताना त्याच्या मुलांना बाजूला करून, आधी त्याची बोटं कापली, यानंतर उजव्या हाताचे मनगट छाटले आणि नंतर धारधार शस्त्राने डोक्यावर व गळ्यावर वार अतिशय निघृणपणे हत्या केली.
या भयानक गुन्हेगारी घटनेची माहिती मिळताच शहरात एकच खबळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार बुधवारी इम्रान हा त्याचा १३ वर्षीय मुलगा आयान आणि तीन वर्षीय मुलगा आजान यांना रिक्षातून घेऊन जात होता. तितक्यात सिल्क मिल कॉलनी परिसरात उड्डाण पूलाखाली एका कारने रिक्षा अडवली. यानंतर किमान पाच ते सहा जण कार बाहेर आले, त्यांनी सर्वप्रथम मुलांना बाजूला केलं आणि मग धारदार शस्त्राने वार करून इम्रानची निघृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तपास सुरू केला आणि दहा तासांच्या आत प्रमुख संशयित मुजीब डॉनसह त्याचा भाऊ सद्दाम हुसैन मोईनोद्दीन व शेख इरफान शेख सुलेमान यांना बीडबाय पास रोडवरील झाल्टा फाटा येथून अटक केली. यावेळी त्यांच्या कारमध्ये चाकू आणि तलवार आढळून आली.
प्राप्त माहितीनुसार, सय्यद मुजीब डॉनसोबत इम्रानचा जुना वाद होता. यातूनच ३१ मे रोजी त्यांच्या गटात हाणामारीही झाली होती. ज्यानंतर सय्यज मुजीब, सय्यद सद्दाम यांच्यासह आठ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला गेला होता. याचाच बदला म्हणून इम्रानची हत्या झाली असल्याचे पोलिसांकडून सांगितले गेले आहे. घटनेतील आरोपींना अटक केली गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.