Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024 Esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024: औरंगाबादमध्ये तिरंगी लढत चुरशीची होणार? वंचित सोबत नसल्याने एमआयएमला फटका बसण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024: औरंगाबाद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. चंद्रकांत खैरे यांनी सलग चार वेळा विजय मिळवला. मागील निवडणुकीत मात्र मतांच्या फाटाफुटीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी त्यांचा थोड्या मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही महाविकास आघाडी, महायुती तसेच जलील मैदानात असतील. याशिवाय मराठा फॅक्टर महत्वाचा असेल. समाजातील तगडा अपक्ष उतरविण्याची तयारी सुरु आहे. या बदलांमुळे सर्वच पक्षांच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता असल्याने अत्‍यंत चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

२०१९ चे चित्र

इम्तियाज जलील (एमआयएम) विजयी मते : ३,८९,०४२

चंद्रकांत खैरे (शिवसेना) मते : ३,८४,५५०

हर्षवर्धन जाधव (अपक्ष) मते : २,८३,७९८]

सुभाष झांबड (काँग्रेस) मते : ९१,७९०

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : एमआयएम

सद्य:स्थिती

मागील निवणुकीप्रमाणे तिरंगी लढत राहील

शिवसेना ठाकरे गटाकडून तिकिटासाठी रस्सीखेच. खैरे हेच उमेदवार असण्याची शक्यता

भाजपकडून डॉ. भागवत कराड व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे नाव चर्चेत

‘वंचित सोबत नसल्याने एमआयएमला होणार फटका

जय बाबाजी भक्त परिवाराचा उमेदवार राहिल्यास मतांची विभागणी होईल

हे मुद्दे प्रभावी ठरणार

पिण्याचा पाण्याचा मुद्दा खूप महत्त्वाचा

विकास आराखड्याचा मुद्दा महत्त्वाचा

शहराचे नामकरण झाल्याने धुव्रीकरण

मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप प्रभावी राहील

मतदानापूर्वी धार्मिक धुव्रीकरण होते

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह पायाभूत सुविधांचा अभाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT