Sambhaji Nagar Corporation sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Corporation : नवी प्रभाग रचना ठरणार डोकेदुखी ; अपक्षांना फटका, मोठ्या पक्षांचा हाेईल फायदा

महापालिकेच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या असल्या तरी निवडणूका प्रभाग पद्धतीने होणार का? वॉर्ड पद्धतीने व किती वॉर्डांचा एक प्रभाग असेल याविषयीचे वारंवार निर्णय बदलत आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या असल्या तरी निवडणूका प्रभाग पद्धतीने होणार का? वॉर्ड पद्धतीने व किती वॉर्डांचा एक प्रभाग असेल याविषयीचे वारंवार निर्णय बदलत आहे. आता राज्य शासनाने मुंबई वळता राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग रचननेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर महापालिकेच्या निवडणूका होतील, असा अंदाज बांधला जात आहे. शुक्रवारी (ता. २९) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिका निवडणुकांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

प्रभागांचा आकार वाढणार असल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना नाकीनऊ येणार आहे. त्यासोबतच खर्चही वाढणार आहे. एका प्रभागात चार उमेदवार असतील, त्यामुळे प्रचार करताना मोठ्या राजकीय पक्षांचा फायदा होईल, तर अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या उमेदवारांची दमछाक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता होतील २८ प्रभाग

यापूर्वी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील वॉर्डांची संख्या शासनाने ११५ वरून १२६ केली होती. त्यावेळी तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे ४२ प्रभाग तयार करण्यात आले होते. मात्र वाढीव वॉर्ड रद्द करण्यात आल्याने पुन्हा शहरातील वॉर्डांची संख्या ११५ वर आली आहे. आता चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार २८ प्रभाग होतील, असा अंदाज बांधला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT