Crime News sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : शाळेत पालकावर चाकूहल्ला करणाऱ्या दोघांना अटक

प्रकरणात सातारा पोलिसांनी आरोपींपैकी आणखी दोघांना रविवारी (ता. १२) सकाळी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमात घुसखोरी केलेल्या टवाळखोरांनी एका पालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली होती. प्रकरणात सातारा पोलिसांनी आरोपींपैकी आणखी दोघांना रविवारी (ता. १२) सकाळी अटक केली. दोघांना मंगळवारपर्यंत (ता. १४) पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. आर. देवरे यांनी दिले.

अक्षय ऊर्फ भैय्या वाहुळ (वय २४, रा. एकता कॉलनी, साईनगर सातारा परिसर) आणि अविनाश ऊर्फ अवी भगवान देवडे (वय २६, रा. नागसेन नगर, उस्मानपुरा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्‍ह्यात वापरलेला चाकू व कपडे हस्‍तगत करायचे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील शशिकांत ईघारे यांनी न्‍यायालयाकडे केली होती.

कडुबा सूरचंद राठोड (रा. सातारा तांडा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीच्‍या मुलीच्‍या शाळेत स्‍नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. शाळेत मुलींचे सादरीकरण सुरू असतानाच काही टवाळखोरांनी धिंगाणा सुरू केला. त्यामुळे कडुबा राठोड यांनी टवाळखोरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, स्नेहसंमेलन संपल्यानंतर कडुबा राठोड हे शाळेबाहेर पडले असताना अक्षय वाहुळ आणि अविनाश देवडे याच्यासह तिघांनी त्यांना अडवून मारहाण सुरू केली तसेच अक्षयने फिर्यादीच्या पोटात चाकू भोसकून त्‍यांना गंभीर जखमी केले. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वसई किल्ल्यावर शिवरायांच्या पोषाखात फोटो काढताना अडवलं, हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाचा मराठीत बोलण्यास नकार; VIDEO VIRAL

Akola News: सालासार मंदिरात मध्यरात्री चोरी; एलसीबी, डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक युनिट घटनास्थळी

'तु हिंदू आहेस की मुस्लिम' सारा अली खान पोहचली केदारनाथ धाममध्ये, म्हणाली...'माझ्याकडे जे आहे ते...'

Govardhan Puja: शेणाच्या वाड्याची परंपरा जपते मातीशी नाळ; गोवर्धन पूजा पर्यावरण, शेती आणि पशुधनाशी दर्शविते जीवनसंबंध

Latest Marathi News Live Update : आमदार गोपीचंद पडळकरांनी साजरी केली भाऊबीज

SCROLL FOR NEXT