chhatrapti sambhajinagar crime attempt to kill child husband wife dispute Life imprisonment police court Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून, मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न; नराधमाला जन्मठेप

पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून पोटच्या मुलावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून पोटच्या मुलावर प्राणघातक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाला आजन्म कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. कोचे यांनी मंगळवारी (ता.४) ठोठावली. योगेश हरी गोपाळ (वय ३५, रा. हेंद्रुन ता.जि. धुळे) असे नराधमाचे नाव आहे.

प्रकरणात सविता योगेश गोपाळ (२८, रा. महेंद्रू ता.जि. धुळे, ह.मु सायगव्हाण ता.कन्नड) यांच्या फिर्यादीनुसार, घटना घडण्याच्या आठ वर्षांपूर्वी फिर्यादी व आरोपी यांचे लग्न झाले होते. मात्र दोघांचे पटत नसल्याने फिर्यादी कोर्टामार्फत नांदायला गेली होती.

त्यानंतर त्यांना जीवन (वय ५) आणि कार्तिक (अडीच वर्ष) अशी दोन मुले आहेत. आरोपी हा म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. आरोपी फिर्यादीला नेहमी मारहाण करून माहेरी आणून सोडत होता.

घटनेच्या दहा दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला माहेरी आणून सोडले व मुलांना स्वतःकडे ठेवून घेतले. ३१ डिसेंबर २०२१ला सायंकाळी फिर्यादी या शेतात कामाला असताना त्यांच्या आईने आरोपी हा मुलगा जीवन याला घेऊन आला असून तो घराजवळील पांढरी शेतात थांबला असल्याचे सांगितले.

त्यामुळे फिर्यादी धावतच पांढरी शेतात गेल्या. त्यावेळी आरोपीने जीवनला तुला भेटायचे आहे. लवकर ये नाहीतर तुला हातातील वस्तारा दाखवत या वस्ताऱ्याने मारून टाकीन असे म्हणत होता. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने आरडा-ओरडा केल्याने फिर्यादीच्या आईसह इतर नातेवाईक तेथे गोळा झाले.

त्यावेळी आरोपीने माझी बायको माझ्याकडे नांदायला येत नाही, असे म्हणत जीवनसह तिला मारून टाकतो आणि मी पण मरून जातो असे म्हणाला. त्यामुळे उपस्थित लोक आरोपीला वस्तारा खाली फेकण्याची विनवणी करीत होते.

परंतु आरोपीने जीवनला जमिनीवर आडवे करून त्याच्या पोटावर आणि गळ्यावर वस्ताऱ्याने वार केला. त्यामुळे जीवनच्या पोटातून आतडी बाहेर येऊन तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर देखील वार केला होता.

प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक एस.एस. राजपूत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी ११ साथीदारांचे जबाब नोंदवले.

सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी योगेश गोपाळ याला दोषी ठरवून भादंवि कलम ३०७ अन्वये आजन्म कारावास, कलम ३०९ अन्वये एक वर्षांचा कारावास आणि भादंवि कलम ५०६ अन्वये दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT