Chh. Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar: मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये सर्वाधिक संख्या; राज्यात साडेबारा कोटी आधार कार्ड वाटप

आधार कार्डावरून कोणत्या जिल्ह्याची किती लोकसंख्या आहे याचा अंदाज येतो.

- शेखलाल शेख

छत्रपती संभाजीनगर - देशात आतापर्यंत १३७ कोटी ५७ लाख ८७ हजार ८३० नागरिकांना आधार कार्ड देण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील १२ कोटी ६१ लाख ७० हजार ५११ नागरिकांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक १ कोटी ३९ लाख ८९ हजार १५ आधार कार्ड मुंबई उपनगरात वाटप करण्यात आले.

त्या खालोखाल पुणे १ कोटी ३५ लाख ७४ हजार ५५, ठाणे १ कोटी १९ लाख ४६ हजार ९२, नाशिक ६९ लाख ६८ हजार ५८५, नागपूर ५२ लाख ९६ हजार ४७५ नागरिकांना आधार कार्ड (निर्गमित करण्यात आले) देण्यात आले आहे. आधार कार्डावरून कोणत्या जिल्ह्याची किती लोकसंख्या आहे याचा अंदाज येतो. यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर जिल्ह्यांत राज्याची सर्वाधिक लोकसंख्या असल्याचे दिसून येते.

मुली, महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक

महाराष्ट्रात आधार कार्डानुसार वयोगटाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यात ० ते ५ वयोगटातील बालकांची संख्या ही ३.२ टक्के एवढी आहे. यामध्ये मुलांची संख्या १.६४ तर मुलींची संख्या १.५६ टक्के आहे. ५ ते १८ वयोगटातील १९.५४ टक्के नागरिकांकडे आधार आहे.

यात मुलींची संख्या ९.२९ तर मुलांची संख्या १०.२५ टक्के आहे. १८ वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील नागरिकांची संख्या ७७.२६ टक्के एवढी आहे. यात महिलांची संख्या ३७.१ तर पुरुषांची संख्या ४०.१६ टक्के एवढी आहे.

आधारचे वाढते महत्त्व

बहुतांश ठिकाणी ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा म्हणून आता आधार कार्ड मागितले जाते. बँक खाते उघडण्यापासून तर खाते लिंक करण्यापर्यंत आधार कार्डाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्ड लिंक केले जात आहे.

घर, जमीन खरेदी विक्रीत आधार कार्ड महत्त्वाची भूमिका निभावत आहे. इतकेच नव्हे तर पॅनकार्डसोबत आधार कार्ड लिंक करावे लागत आहे. आता लहान मुले असो की वयोवृद्ध त्यांच्याकडे आधार कार्ड असणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे.

जिल्हानिहाय आधार कार्डाची संख्या

मुंबई उपनगर - १,०३९,८९१५

मुंबई शहर- ३३,०८,१३३

पुणे- १,०३५,७४५५

ठाणे- १,०१९,४६९२

नाशिक- ६९,६८५८५

नागपूर-५२,९६४७५

नगर- ५१,६०९०४

सोलापूर-४८,६३१८०

जळगाव- ४८,५३९२९

छत्रपती संभाजीनगर ४३,३८२०१

कोल्हापूर-४२,७६,७१०

नांदेड- ३६,४४,२४२

सातारा- ३३,६०,३०५

अमरावती-३२,३२,३३६

सांगली-३१,९७,३३३

यवतमाळ-३०,६४,९५६

बीड- ३०,०४,०५१

रायगड-२९,९३,८७३

बुलडाणा-२९,२१,५०५

लातूर- २६,७८,९०३

धुळे- २४,४३,९१६

चंद्रपूर- २३,९५,९७०

जालना- २२,८१,८५०

पालघर- २१,५९,८३२

परभणी- २०,५९,१७९

अकोला- २०,३१,५४८

नंदुरबार- १८,८२,५४९

रत्नागिरी- १८,७२,५५९

धाराशिव- १८,४१,३८५

गोंदिया- १४,९५,७०५

वर्धा- १४,७०,०९९

भंडारा- १३,५२,७८०

वाशिम- १३,५२,३३६

हिंगोली- १३,३३,१७१

गडचिरोली- ११,८६,२७७

सिंधुदुर्ग- ८,९६,६७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT