Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

वडील म्हणाले मला दुसरी बायको आणायची मग..काय

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मला दुसरी बायको घरात आणायची आहे. तू या घरात राहू नकोस असे म्हणत बापानेच मुलाला मारहाण केली. ही घटना पंढरपूर येथील फुलेनगरात घडली आहे. दुसऱ्या बायकोच्या नादापायी बापानेच मुलाला बेदम मारहाण केल्याने ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. 

सादीक सय्यद अयुब सय्यद (२९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते मंगळवारी ता. 2 राेजी रात्री घरी आल्यावर पिता अयुब उस्मान सय्यद याने तू घरात येऊ नको, मला दुसरी बायको घरात आणायची आहे असे म्हणाला. तसेच त्याने शिवीगाळ व मारहाणीला सुरवात केली. त्यावर सादीकने माझ्या घरात दुस-या बाईला आणायचे नाही असे म्हणताच त्याच्या डोक्यात वडिलांनी धारदार वस्तूने वार केला.

त्यावरुन अयुब सय्यद याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुलाने वडिलांकडे काही गोष्टीचा हट्ट केला तर विशेष बाब नाही,  मात्र वडिलांनी चक्क दुसरी बायको घरात आणण्यासाठी मुलाकडे हट्ट केला आणि तो ऐकत नाही म्हणून शिवीगाळ करून त्यालाच मारले. त्यामुळे ही घटना मोठी चर्चिली जात आहे. 

जुगार खेळणाऱ्या चौघांवर कारवाई   
जुगार खेळणाऱ्या चौघांना शनिवारी (ता. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३९ हजार २३० रुपये व साहित्य जप्त करण्यात आले आहे. शेख जावेद शेख महेबूब, अब्दुल हमीद अब्दुल करीम, सय्यद अफसर आणि शेख सलीम शेख रमजान अशी त्यांची नावे आहेत. हे चौघेही आसेफिया कॉलनीतील एका आठ बाय दहाच्या खोलीत तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा मारून त्यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  

दहा हजारांची गावठी दारू जप्त 
चोरटी विक्रीसाठी गावठी दारू बाळगल्याप्रकरणी अजय रमेश ठाकूर ऊर्फ ठाकूर (२५, रा. सातारा परिसर) विरुद्ध सातारा पोलिसांनी शनिवारी (ता. ३०) कारवाई केली. अजय ठाकूर बावन्न घर या ठिकाणी गावठी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास छापा मारला. यावेळी दोन ड्रममधील १५५ लिटर दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी जमादार विलास वैष्णव यांच्या तक्रारीनुसार सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT