संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

शहरवासीयांचे माकडचाळे गावासाठी डोकेदुखी

संदीप लांडगे

औरंगाबाद : व्यवसाय, नोकरीनिमित्त शहरवासी झालेले कारोनाच्या भीतीने पुन्हा गावात आले आहेत. त्यामुळे शहरे ओस पडली असून, गावे गजबजू लागली आहेत. मात्र, शहरातून गावांत दाखल झालेली हीच मंडळी आता गावकऱ्यांसह पोलिसांना डोकेदुखी ठरू लागली आहेत. कोरोनाच्या भीतीने गावाकडे धूम ठोकलेली ही मंडळी गावभर हाप चड्डी, बरमुडा घालून स्वतःच्या फुशारक्या मारत फिरताना दिसत आहे. एवढेच नाही तर नदीत, विहिरीत पोहणे, पत्ते कुटणे, क्रिकेट खेळणे यामुळे गावांमध्ये लॉकडाऊनचे तीन-तेरा झाले आहेत. 

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शहरातील मंडळी मिळेल ती वाहने पकडून गावाकडे आली. ज्यांना वाहने मिळाली नाहीत, त्यांनी पाचशे ते हजारो किलोमीटरचा प्रवास मोटारसायकलवर करून गाव गाठले. गावांत आलेल्या या मंडळीने स्वतःला कोरंटाईन करून घेणे आवश्‍यक होते. मात्र, ही मंडळी गावात माळरानात हाफ चड्डीवर फिरत पूर्ण परिसर पिंजून काढत आहेत. रोज विहिरीवर, नदीवर, बंधाऱ्यावर पोहायला जाणे, दुपारी एकत्र येऊन पत्ते कुटणे, सायंकाळी मुलांना घेऊन क्रिकेट खेळणे असे उद्योग सुरू केले आहेत. 

त्यामुळे लॉकडाऊनचे तीन-तेरा वाजले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावांत गस्त घालणे सुरू असते. त्यामुळे पोलिसांची गाडी गावात आलेली दिसली की, ही मंडळी घरात जाऊन बसतात अन् पोलिस गावच्या वेशीपर्यंत जात नाही तोच ही मंडळी पुन्हा घरातून बाहेर येत आपले कारनामे, उचापती सुरू करतात, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. 

वाचा...  विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान   

रात्रीच्या वेळी गावात होतात दाखल 
सध्या राज्यासह सर्व जिल्ह्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही मंडळी मुंबई, पुण्यातून रात्रीच्या वेळी मोटारसायकल वर प्रवास करून येतात. परिणामी, कोरोना आटोक्यात येणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पोलिसांनी अशा बहाद्दरांवर गुन्हे दाखल करायला सुरवात केली आहे. आतापर्यंत औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात लोकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग रात्रंदिवस काम करीत आहेत; मात्र मुंबई, पुण्यातून दाखल झालेली ही मंडळी सर्वांनाच डोकेदुखी ठरू लागली आहे. कोरोना हरविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे पोलिसांकडून आवाहन केले जात आहे. 
--

Citizens in the city in fear of the Corona virus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT