औरंगाबाद महापालिका 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद पालिका निवडणुकीची तयारी, प्रभाग रचनेसाठी समिती स्थापन

औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगातर्फे महापालिकेला देण्यात आले आहेत.

माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगातर्फे महापालिकेला देण्यात आले आहेत. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच कामकाज सुरु होईल, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी सांगितले. राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुका त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पांडेय म्हणाले, की महापालिकेच्या जुन्या वाॅर्ड रचनेवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र आता राज्य (Aurangabad) सरकारने वाॅर्ड पद्धत बंद करुन त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जुनी वाॅर्ड रचना आपोआप रद्द होणार आहे. तसे सर्वोच्च न्यायालयात कळविल्यानंतर ही याचिका निकाली निघू शकते. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने (Aurangabad Municipal Corporation Election) केवळ कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेचे कामकाज राज्य सरकारच्या आदेशानुसार चालते. त्यामुळे आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, उपायुक्त संतोष टेंगळे, सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर यांचा समावेश आहे. लवकरच प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले जाईल. हे काम गोपनीय पद्धतीचे आहे, असे पांडेय यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT