वाळूज (जि.औरंगाबाद) : मारहाणीत जखमी झालेले गणेश कोटींगचे व्यवस्थापक शिरीष राजेभोसले. सकाळ
छत्रपती संभाजीनगर

कंपनी व्यवस्थापकाला बेदम मारहाण, औरंगाबादनंतर वाळूजलाही गुंडगिरी

रामराव भराड

वाळूज महानगर (जि.औरंगाबाद) : कामगार ठेकेदारी न मिळाल्याने कंपनीच्या व्यवस्थापकाला सहा-सात जणांनी रस्त्यात अडवून मंगळवारी (ता.दहा) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बेदम मारहाण केली. यामुळे वाळूज (Waluj) परिसरातील उद्योजकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील (Waluj MIDC) एम सेक्टरमधील श्री गणेश कोटिंग (Shri Ganesh Coating Company) या कंपनीत शिरीषकुमार उमाजी राजेभोसले (वय ४१, रा.नक्षत्रवाडी) हे व्यवस्थापक आहेत. या कंपनीत जवळजवळ ३७५ कामगार काम करतात. या कंपनीत (Crime In Aurangabad) कामगार ठेकेदारी मिळवण्यासाठी कायम ठेकेदारांची वर्दळ असते. मागील काही दिवसांपूर्वी एक कामगार ठेकेदाराने या कंपनीत येऊन ठेकेदारी मिळवण्यासाठी राजेभोसले यांची भेट घेतली.

त्यानंतर वारंवार फोन करून ठेकेदारी मिळवण्यासाठी दबाव आणत धमकीही राजेभोसले यांना दिली होती. त्यानंतर मंगळवारी राजेभोसले हे कंपनीतील काम आटोपून घरी जाण्यासाठी दुचाकीहून निघाले असता काही अंतरावर त्यांना १० ते १२ गुंडांनी अडवून बेदम मारहाण केली. मारहाण का करता, असे राजेभोसले यांनी विचारले. मात्र, काही एक न बोलता त्यांना मारहाण केली. यात राजेभोसलेंच्या हाताला, पोटात, डोळ्यावर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी राजेभोसले यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शरद किर्तीकर, किरण किर्तीकरसह ६ते ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरीषकुमार यांच्याविरुद्धही तक्रार

रांजणगाव (शेणपुंजी) येथील एकतानगरात राहणारा सादिक नवशाद सय्यद हा अब्दुल शेठ यांच्या टेम्पोवर काम करतो. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहत येथील अंबिका काटा येथे भंगाराचे वजन करण्यासाठी टेम्पोसह गेला होता. त्याच वेळी तेथे भांडण सुरू असल्याने सय्यद हा भांडण पाहण्यासाठी गेला होता. दरम्यान शिरीष कुमार राजेभोसले यांनी काहीतरी धारदार वस्तूने त्यास मारून जखमी केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात शिरीषकुमार राजेभोसले यांच्याविरुद्धही तक्रार देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT