Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
छत्रपती संभाजीनगर

जून अखेरीस होणार औरंगाबाद विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

पदवीधरांची ऑनलाईन नोंदणी सुरु, यासाठी १० जूनची मुदत

अतुल पाटील

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ (Convocation Ceremony) जून अखेरीस ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी येत्या १० जूनपर्यंत पदवी, पदवीधर, एमफिल व पीएच. डी. धारकांकडून आवेदन मागविण्यात येत आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.

विद्यापीठाकडून (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१९ आणि मार्च/एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत उत्तीर्ण व पदवीस पात्र स्नातकांचा ६१ वा दीक्षांत समारंभ जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्यात येणार आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी कुलगुरू पदाची सूत्रे घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत ५९ वा सप्टेंबर २०१९ आणि फेब्रुवारी २०२० महिन्यात ६० वा दीक्षांत समारंभ झाला होता.


दीक्षांत समारंभासाठी पदवीस पात्र स्नातकांकडून उपस्थितीत आणि अनुपस्थितीत पदव्यांचा अनुग्रह करण्यासाठी पदवी आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत. पात्र अशा स्नातकांनी पदवी आवेदनपत्र १० जून पर्यंत ऑनलाईन भरून विद्यापीठाच्या परीक्षा विभागात व्यक्तिश: अथवा टपालाने प्राप्त होतील, या बेताने पदवी आवेदनपत्रासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावीत. यामध्ये पदवी व पदविका अभ्यासक्रम, पदव्यूत्तर अभ्यासक्र, पदव्यूत्तर अभ्यासक्रमानंतरचे अभ्यासक्र, पीएच.डी. प्रमाणपत्र तसेच जे स्नातक पदवीस पात्र आहेत व ज्यांनी परीक्षा आवेदनापत्रासोबत पदवी आवेदनपत्र सादर केलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आवेदन दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन डॉ. योगेश पाटील यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT