Corona News Aurangabad
Corona News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

फोन करा, दोन तासात मिळेल जेवण ; महापालिकेचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत असून, त्यांच्यासाठी महापालिका धावून आली आहे. शहरातील गरजूंना अन्नासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आता महापालिकेमार्फत केला जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी किंवा नियंत्रण कक्षात फोन केल्यास अवघ्या दोन तासात घरपोच अन्न व वस्तू दिल्या जाणार आहेत. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर आधी राज्य शासनाने तर नंतर केंद्र शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक हाल हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचे होत आहेत. त्यामुळे औरंगाबाद फर्स्ट, महापालिका, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी एकत्र येत गोरगरिबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या पत्नी तथा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही आपला एक महिन्याचा पगार दिला आहे. तसेच महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांनी आपले एका दिवसांचे वेतन देण्याचे जाहीर केले. नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देखील या उपक्रमासाठी घेतले जाणार आहे.

ही सुमारे पंचावन्न लाख रुपयांची रक्कम होत असून, या रकमेतून अन्नधान्य व आवश्‍यक वस्तू गरजूंना दिल्या जाणार आहेत. महापालिकेने मदतीची मागणी ऑनलाइन पद्धतीने केली आहे. emergency-need.com या मेल आयडीवर मागणी नोंदविणे गरजेचे आहे. या मेल आयडीवर मागणी नोंदवल्यास संबंधिताला अन्नासह जीवनावश्यक वस्तू पोचवल्या जाणार आहेत. तसेच अनेकांना ऑनलाइन पद्धतीची माहिती नसते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेत सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी ८९५६३०६००७ या क्रमांकावर फोन करून मागणी नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मागणी नोंदविल्यानंतर अवघ्या दोन तासात घरपोच मदत दिली जाणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT