कोरोना  sakal media
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पुढील आठवड्यात वेगाने कोरोना रुग्णवाढ

तज्ज्ञांचे निरीक्षण; पंधरा दिवस राहील स्थिती, नंतर पुन्हा रूग्णसंख्या होईल कमी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मुंबईत गेल्या चार दिवसांत रूग्णसंख्येचा स्फोट झाला. तेथे डेल मायक्रॉनची फेज कमी कमी होत असून ओमिक्रॉनची फेज आली आहे. औरंगाबादेतही अशीच स्थिती असून पुढील आठवड्यात रूग्णसंख्या वेगाने वाढेल. पंधरा दिवस रूग्णसंख्या वाढून ती पुन्हा कमी होईल, असे निरीक्षण घाटी रूग्णालयातील औषधशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मीनाक्षी भट्टाचार्या यांनी नोंदविले आहे.

प्रादुर्भावाचा विचार केल्यास पंधरा दिवस महत्वाचे असून रूग्णवाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे. सध्या जे ही रूग्ण सापडत आहेत ते ओमिक्रॉनचे ()आहेत. रूग्णसंख्येत तिव्र वाढ आणि त्यानंतर तिव्रतेने कमी (stip rise and stip fall) होईल. विषाणूची तीव्रताही कमी झाल्याचे आढळून येत आहे. अर्थात हर्ड इम्युनिटी येऊन जाईल. त्यामुळे येत्या काळात विषाणूची तीव्रता कमीच असल्याचे निरीक्षणे समोर आली आहेत.

ओमिक्रॉन त्यांच्यासाठी साध्या फ्लूसारखा

ज्या व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस(vaccine dose ) पूर्ण झाले आहेत, अशांना या विषाणूचा धोका नाही. त्यांच्यासाठी ओमिक्रॉन संसर्ग (omicron)साधा फ्लुसारखा असल्याचे दिसून येत आहे. पण लसीकरण न झालेल्यांना अजूनही धोका आहे. एक डोस घेतलेल्यांनाही तेवढाच धोका आहे. म्हणून दुसरा डोस तात्काळ घ्यायला हवा, असेही डॉ. भट्टाचार्या म्हणाल्या.

ही घ्या काळजी

लक्षणे सुरू झाली की, गुळण्या करायला हव्यात. हा सुरुवातीच्या काळातील सर्वात चांगला उपाय आहे. वाफ घेण्यापेक्षाही गुळण्या महत्वाच्या असून बिटाडीन अथवा हळदीने खळखळून गुळण्या करायला हव्या. त्यामुळे घशात आलेले व बसलेले जंतू तेथूनच निघून जातात. व्हायरल लोड कमी होईल.

डेल्टा मायक्रॉन म्हणजे काय?

सध्याच्या स्थितीत डेल्टा व्हेरीयंट अजूनही आहे, तो गेलेला नाही. त्यातच ओमिक्रॉन व्हेरीयंटही आला. डेल्टा असणे व ओमिक्रॉनही असणे या फेजला ‘डेल मायक्रॉन’ म्हणतात. ओमिक्रॉन विषाणूचा सुरुवातीला संसर्ग दहा टक्क्यांपर्यंत होता. तो टप्याटप्याने वाढत आता सत्तर टक्क्यांपर्यंत पोचला. समाजात सध्या सत्तर टक्के ओमिक्रॉन व तीस टक्के डेल्टा बाधित रूग्ण आहेत. या टप्प्याला डेल मायक्रॉन म्हणतात. आगामी काळात केवळ ओमिक्रॉनचेच रूग्ण आढळतील असाही टप्पा येईल, असेही डॉ. भट्टाचार्या यांनी नमूद केले.

येत्या पंधरा दिवसाच्या काळात रूग्णवाढीचा स्फोट होईल व त्यानंतर परत रूग्णसंख्या कमी होत जाईल. म्हणून पंधरा दिवसाच्या या काळात स्वःतला व कुटुंबाला सांभाळा. ज्याने त्याने ज्याची त्याची सुरक्षा घेणे महत्वाचे आहे. या काळात जेवढा संपर्क कमी करता येईल तेवढा कमी करायला हवा, गर्दी करू नका. मास्कचा सुयोग्य वापर करावा. कार्यक्रम, समारंभाला हजेरी लावणे टाळा. ते आयोजित करणेही टाळा.

- प्रा. डॉ. मीनाक्षी भट्टाचार्या,

औषधशास्त्र विभागप्रमुख, घाटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT