2Subhash_Desai_1 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी यंत्रणा सतर्क ठेवा, पालकमंत्री सुभाष देसाई यांची सूचना

माधव इतबारे

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असला तरी संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता. ११) आढावा बैठकीत दिले. जिल्ह्यातील विविध विकास योजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील विकास कामे व जिल्हा परिषद तथा महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाने, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे उपस्थित होते. पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, की कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रशासनाने सज्ज रहावे. तसेच केंद्र शासनाच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेमध्ये काम करण्यास संधी असून, उद्योग विभाग व जिल्हा प्रशासनाने एकत्रित प्रयत्नातून काम करावे. महानगरपालिकेची विकास कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT