छत्रपती संभाजीनगर

तुमच्या गाडीमुळं कोरोना होईल गल्लीत आणू नका

शेखलाल शेख


औरंगाबादः कोरोनाच्या धास्तीने बहुतांश जणांनी त्यांच्या गल्ल्या, कॉलनी बंद केल्या आहेत. दोरी, लाकडं बांधुन, पाईप टाकून रस्ते बंद करण्यात आले सध्या रेड झोन मध्ये तर अतिशय कडक परिस्थिती आहे. आता शहरात कोरोना बांधितांची संख्या वाढत असल्याने दुसऱ्या गल्लीतील व्यक्तींनी आमच्या गल्लीत येऊ नये, बाहेरच्या कॉलनीतील व्यक्ती सुद्धा येता काम नये अशी कडक भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र या सर्वांमध्ये जीवनावश्‍यक वस्तू खरेदी, अत्यावश्‍यक सेवेच्या कामात असलेल्या व्यक्ती, नोकरदार, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. 

औरंगाबादेतील कोरोना बांधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आपली कॉलनी, गल्ली सुरक्षित रहावी यासाठी बहुतांशी जणांनी अगोदरच गल्ल्या बंद केल्या या गल्ल्यांमधून साधे दुचाकी गाडी काढणे सुद्धा अवघड आहे.

मात्र कित्येक जण पायीच बाहेर पडतात. दुसऱ्या गल्लीतील लोक सुद्धा मुख्य गल्लीतून पायी जातात. काही जणांना प्रमुख गल्लीतून पायी जाण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र आता कोरोना बांधितांची संख्या वाढत असल्याने गल्लीतील रहिवाशांनी कडक भूमिका घेतल्या आहे. बाहेरच्या गल्लीतील व्यक्तींना आता आपल्या गल्लीतील नो एन्ट्री करण्यात आली आहे. याचा त्रास सुद्धा काही जणांना सोसावा लागतोय. 

अत्यावश्‍यक सेवेतील कामगार, नोकरदारांना त्रास 

गल्ल्या बंद केल्याने जे अत्यावश्‍यक सेवेत काम करतात अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या दुचाकी, चारचाकी गाडी बाहेर काढता येत नाही. त्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी अडचणी येतात. तसेच गाडीसाठी गल्ल्तील रस्ता मोकळा केला तर वाद होत आहे. गाड्या बाहेर घेऊन गेल्याने गल्लीत कोरोनाचा धोका होऊ शकतो असा काही जणांचा समज आहे. गल्ल्या, कॉलनी बंद केल्या तरी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात जावेच लागते. मात्र त्यांच्याकडे अनेक जण संशयाच्या नजरेने बघतात. 

रेड झोन मध्ये सर्वाधिक त्रास 

शहरातील अतिशय दाट वस्ती असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. अगोदरच त्या वस्त्या दाट आहे. गल्ल्या अरुंद आहे. त्यातच घरासमोर गाड्या उभ्या असतात. सध्या लोकांनी या गल्ल्या बंद केल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवेतील ज्यांना ड्युटीवर जायचे आहे. त्यांना गाडीच काढता येत नाही. त्यांना कार्यालयाची गाडी बोलवावी लागते. किंवा इतर मार्गाचा अवलंब करावा लागतोय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT