औरंगाबाद: मराठवाड्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच असून, शनिवारी (ता. २०) दिवसभरात आठ जिल्ह्यांमध्ये तब्बल चार हजार २६२ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ६८९ नवे रुग्ण तर २० मृत्यूची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी ५५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ५,४०५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी एकूण १,६७९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली तर २० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५,९२२ झाली आहे. आजपर्यंत एकूण १,४०८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १०,४५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यात शनिवारी तब्बल ९४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ३४० रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी सात बाधितांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल ३२३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यात शहरातील मस्तानशहा नगर येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात नवीन ११९ रुग्ण आढळून आले आहेत. जालना जिल्ह्यात पाचजणांचा मृत्यू झाला तर ५२० नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात २६५ नवे रुग्ण तर दोन मृत्यू, उस्मानाबाद जिल्ह्यात १२५ रुग्ण, लातूर जिल्ह्यात एक मृत्यू तर २८४ रुग्णांची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.