remdesivir
remdesivir 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus: ‘रेमडेसिव्हिर’ आता चौदाशे रुपयांत! मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचा निर्णय

मनोज साखरे

औरंगाबाद: कोरोना बाधित रुग्णांसाठी दिलासादायक ठरलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे दर आता आवाक्यात आले आहेत. पाच हजार चारशे ते अडीच हजारापर्यंत असलेले हे इंजेक्शन आता चौदाशे रुपयांना रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. औरंगाबादेतील मोठ्या रुग्णालयासह जालना येथील दोन रुग्णालयांत हे इंजेक्शन कमी दरात मिळणार आहे, अशी माहिती मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हिमांशू गुप्ता यांनी दिली.

गतवर्षी जून-जुलैनंतर औरंगाबादेत कोरोना संसर्गाची मोठी लाट आली होती. या लाटेनंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. या काळात गंभीर रुग्णांचीही हाल झाले. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ‘रेमडेसिव्हिर’ हे इंजेक्शन जीवनदायी ठरत असल्यामुळे या इंजेक्शनची रुग्णालयस्तरावर मागणी मोठ्या प्रमाणात झाली.

मागणी जास्त व मर्यादित उत्पादनामुळे रेमडेसिव्हिरचा काळा बाजार वाढला. या औषधीचे दर कंपन्यांनी चार हजार रुपये असतील असे सांगितले होते; परंतु आता हीच मागणी प्रचंड असल्याने तेव्हा आठ ते तीस हजार रुपयांपर्यंत इंजेक्शन विकल्या गेले. यात मोठ्या प्रमाणावर नफेखोरी झाली त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना रेमडेसिविरअभावी प्राणही गमवावे लागल्याची स्थिती होती.

लाट ओसरल्यानंतर हळूहळू मागणी कमी झाली, अर्थातच या इंजेक्शनचे दरही अडीच हजारांपर्यंत स्थिरावले होते; परंतु आता दुसरी लाट असतानाही मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनने रुग्णांसाठी दर आवाक्यात चौदाशे रुपये एवढे ठेवले आहे. रुग्णालयातच चौदाशे रुपयांना रेमडेसिव्हिर मिळते. त्यामुळे औषधी दुकानात येणाऱ्या ग्राहकांना औषध विक्रेत्यांना त्याच दरात रेमडेसिव्हिर विक्री करावे लागणार आहे. 

या रुग्णालयात मिळणार रेमडेसिव्हिर 
औरंगाबादचे धूत रुग्णालय, सिग्मा रुग्णालय, एमजीएम रुग्णालय, एमआयटी रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय, बजाज रुग्णालय, माणिक रुग्णालय या सात व जालना येथील दीपक रुग्णालय व विवेकानंद रुग्णालयात रेमडेसिव्हिर चौदाशे रुपयांत मिळेल. 

आमच्या असोसिएशनच्या नऊ रुग्णालयात रेमडेसिव्हिर चौदाशे रुपयांना मिळणार आहे. याशिवाय बाहेरील गरजू रुग्णांनाही याच किमतीत रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात येईल. परंतु रुग्णांना गरज असल्याबाबत डॉक्टरांची चिठ्ठी आवश्‍यक आहे. त्यानंतरच ते देता येईल. 
- डॉ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT