संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

१५ जूनला शाळा म्हणजे अतिघाई का...

संदीप लांडगे

औरंगाबाद ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र, नवीन शैक्षणिक वर्षासाठी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामध्ये आठवड्यातील ४८ तास शाळा सुरू ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुटी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल. 

तसेच दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसताना शासनाकडून दिलेले संकेत अतिघाईचे वाटत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या आहेत. 

याबाबत शहरातील मराठा शाळेचे रूपेश मोरे यांनी सांगितले, की शाळा हे उद्योग, व्यापार सुरू करण्याइतके सोपे नाही. मुलांना कितीही सूचना दिल्या, लक्ष ठेवले तरी शेवटी ती मुलेच आहेत. शिक्षक नजरेआड गेले तरी मुले शारीरिक अंतराचा नियम पाळतील याची शाश्‍वती नाही. समजा, शाळा सुरू झाल्यानंतर दुर्दैवाने शाळा परिसरात एखादा रुग्ण आढळला; तर खबरदारीचा उपाय म्हणून परत काही दिवस ती शाळा बंद ठेवणार का? 

शिवाय ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत क्वारंटाइन लोक ठेवले आहेत, त्यांना जागा कुठे देणार? असे अनेक प्रश्‍न आहेत. भगवान महावीर महाविद्यालयाच्या शिक्षिका कल्याणी सांगोळे म्हणाल्या, की १५ जूनला शाळा सुरू करायच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत खूप मोठे आव्हान शासनापुढे असणार आहे. लॉकडाउन संपल्यानंतर शालेय साहित्य उदा. वह्या, पाठ्यपुस्तके, गणवेश खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी वाढणार आहे. ही गर्दी टाळण्यासाठी शासनाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 

कोरोनाबाधितांची संख्या पुर्णपणे आटोक्यात येत नाही. तो पर्यंत शाळा क्लासेस सुरू करू नये. शिक्षक विद्यार्थ्यांना कडक सुचना देऊन तोंडाला मास्क लावणे हातपाय साबणाने स्वच्छ धुणे, अंतर घेऊनच बाकावर बसणे, अंतर घेऊनच मधल्या सुट्टीत भोजन करणे. अशा सूचनांचे विद्यार्थी कितपत पालन करतील याबाबत शंका आहे. तसेच शिक्षकांनी अध्ययन करावे की इतर गोष्टीकडे लक्ष द्यावे. 
दिलीप वाढे (शिक्षक, महात्मा फुले हायस्कूल)  
--- 
कोरोनामुळे सामाजिक वातावरण संभ्रमित आहे. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवतीलच असे नाही. एखादा शिक्षक कोरोनाबाधित आढळला तर अशा शिक्षक, विद्यार्थी, पालकाकडे बघण्याची मानसिकता काय असेल? म्हणून कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतरच शाळा सुरू होण्याची तारीख घोषित करावी. 
- व्ही. ए. ससे (शिक्षक, शिशुविकास मंदिर शाळा) 

१५ जूनला शाळेत पाठवणे अतिघाईचे ठरेल. अजून कोरोना आटोक्यात आलेला नाही. एखाद्या हॉटस्पॉट भागातून आलेला विद्यार्थी इतर मुलांच्या संपर्कात येऊ शकतो. मुले शाळेत आली म्हणजे एकत्र खेळणार, एक बाथरूम, टॉयलेट वापरणार, कुठेही हात लावणार, एकमेकांचे मास्क ओढणार अशा अनेक समस्या असणार आहेत. 
- मनोहर बडे (पालक) 
 

Coronavirus Updates- Big challenge to start school from 15th June Aurangabad

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT