Aurangabad News CSMSS
Aurangabad News CSMSS 
छत्रपती संभाजीनगर

कोव्हिड १९ - सीएसएमएसकडून २३ लाखांची मदत

अतुल पाटील

औरंगाबाद : कोरोना  विषाणूमुळे (कोव्हिड १९) निर्माण झालेल्या वैश्‍विक महामारीचा प्रादुर्भाव जगभर होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नात छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने (सीएसएमएस) हातभार लावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत मदतीचा हात दिला आहे. सीएसएमएसकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकवीस लाख रुपये तसेच, पंतप्रधान सहाय्यता निधीस दोन लाख रुपयांचा मदतनिधी जमा केला आहे.

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय, दंत रुग्णालय आणि महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी दोन दिवसांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन जमा करून दिले.

व्यवस्थापनातर्फे संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे यांनीही तेवढीच रक्कम या मदतनिधीस जमा केली आहे. संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, विश्वस्त समीर मुळे यांच्या मार्गदर्शनात मदतनिधी जमा करण्यात आला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT