covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

Lockdown: आता शनिवारी, रविवारीही लग्न सोहळ्यांना परवानगी

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २९) काढलेल्या आदेशात प्रत्येक शनिवार आणि रविवारी १०० टक्के बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून येत असल्याने राज्य शासनाने मंगळवारपासून (ता. २९) लॉकडाऊन जारी केला आहे. त्यात बुधवारी (ता. ३०) सुधारणा करण्यात आली आहे. शनिवार, रविवारी हॉटेल्स, मंगल कार्यालयात नियोजित विवाह सोहळे असतील तर त्यांना आता परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २९) काढलेल्या आदेशात प्रत्येक शनिवार आणि रविवारी १०० टक्के बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अनेकांनी शनिवार, रविवारी लग्नाच्या तिथी ठरविल्या होत्या. या आदेशामुळे त्यांची अडचण झाली होती. त्यांची अडचण लक्षात घेता पूर्वनियोजित विवाहांना अटीशर्ती अधीन परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स, मंगल कार्यालयांना या दोन्ही दिवशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र पूर्वनियोजित साखरपुडा, हळदी, विवाह अशा सोहळ्याखेरीज इतर समारंभांना मनाई असेल. या निर्णयामुळे ज्यांचे विवाह हॉटेल्स, मंगल कार्यालयात करण्याचे ठरले होते त्यांना दिलासा मिळाला आहे.

पर्यटन करा सकाळी सात ते दुपारी चार-
पर्यटनस्थळे सुरू ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी व दौलताबाद किल्ला ही पाच पर्यटनस्थळे आता सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत सुरु राहतील. तसेच सकाळी ५०० व दुपारी ५०० अशा एक हजार पर्यटकांनाच आत सोडण्यास परवानगी राहील. घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्यासाठी देखील आता सकाळी सात ते रात्री आठ यावेळेत परवानगी देण्यात आली आहे. फूडकोर्ट, आसनव्यवस्थेसह असलेले खाद्यगृह यांना रात्री आठ वाजेपर्यंत केवळ होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT