covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

दुसरी लाट ओसरली, आता कोरोना मृत्यूदरातही घट

कोरोनामुळे अनेकांचे हाल झाले. रोजगार गेले, होती नव्हती ती जमापुंजीही गेली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा (covid 19 first wave) दुसऱ्या लाटेचा प्रकोप चिंताजनक होता. आता ही लाट ओसरली असून, मृत्यूदरातही मोठी घट (covid 19 death rate) झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर २.३२ टक्के झाला आहे. असे असले तरीही तिसऱ्या लाट (third wave) उसळूच नये, यासाठी प्रत्येकाने स्वतः हातभार लावण्याची व स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोनामुळे अनेकांचे हाल झाले. रोजगार गेले, होती नव्हती ती जमापुंजीही गेली. पण, त्याहीपेक्षा लाखमोलाची माणसं, कुटुंबाचे आधारवड, ज्येष्ठ आई, वडील, मामा, काका, भाऊ व मित्र आप्तेष्ट कायमचेच कोरोनाने हिरावले. या लाटेत प्रत्येक कुटुंबाच्या घरात कोरोनाची झळ बसली. आर्थिकदृष्ट्या हाल सोसणाऱ्या कुटुंबांना मायेची माणसं गेल्याने दुहेरी संकट ओढवले. आता दुसरी लाट ओसरली.

दुसऱ्या लाटेत औरंगाबाद जिल्ह्यात दरदिवशी २५ ते ४५ रुग्णांचे मृत्यू झाले होते. परंतु, आता दिवसागणिक मृत्यूचा आकडा एकेरी आला असून, दरदिवशी सात ते नऊ मृत्यू होत आहेत. सध्याच्या स्थितीत लाट ओसरली व प्रत्यक्ष मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यशही आले. त्यामुळे आता मृत्यूदर २.३२ एवढा आहे. सध्याच्या स्थितीत ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Latest Marathi News Live Update : कॅलिफोर्नियातील जॉर्डन ब्राउन या अमेरिकन नागरिकाला अटक केली

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT