corona vaccination corona vaccination
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत एक लाखाची वेटींग अन् डोस मिळणार सात हजार

महापालिकेची दररोज सुमारे १० ते २० हजार लस देण्याची तयारी आहे पण लसींचा साठा आठवड्यातून एक-दोनवेळाच तेही पाच ते सात हजार एवढाच मिळत आहे

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोनाप्रतिबंधक कोविशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरात दुसऱ्या डोससाठी वेटींग एक लाखावर गेली आहे. असे असताना महापालिकेला शुक्रवारी (ता. २३) रात्री सुमारे सात हजार लसी मिळण्याची शक्यता आहे. लसी उपलब्ध झाल्यानंतर शनिवारी (ता. २४) ३९ केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. यात दुसऱ्या डोससाठी ३४ केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून कोविशिल्ड लसींचा साठा मुबलक प्रमाणात मिळत नसल्यामुळे शहरातील लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. महापालिकेला ११ लाखापेक्षा जास्त लसीकरणाचा उद्दिष्ट आहे तर आत्तापर्यंत पाच लाख ३६ हजार ८८८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

महापालिकेची दररोज सुमारे १० ते २० हजार लस देण्याची तयारी आहे पण लसींचा साठा आठवड्यातून एक-दोनवेळाच तेही पाच ते सात हजार एवढाच मिळत आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची वेटींग वाढतच चालली आहे. शुक्रवारी सुमारे एक लाख नागरिक दुसऱ्या डोससाठी वेटींगवर होते. दरम्यान शुक्रवारी रात्री महापालिकेला सात हजार लसी मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार शनिवारी दुसरा डोस देण्यासाठी ३४ केंद्र तर पहिला डोस घेण्यासाठी पाच केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे.

पहिल्या डोससाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे तर दुसऱ्या डोससाठी कुपन दिले जाणार आहेत. पहिल्या डोससाठी नोंदणी केलेल्या नागरिकांनीच केंद्रावर यावे, इतरांनी गर्दी करू नये, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: “पंचहात्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा..”; मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ! कुणाला दिला सल्ला?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

Pune News : रात्रीतून शहर स्वच्छतेला अखेर सुरुवात; पुणे पालिकेकडून १४७२ कर्मचारी, २१३ वाहनांचा वापर

Satara Accident: उलटा धबधबा पाहायला गेलेला युवक मोटारीसह ३०० फूट खाेल दरीत; जखमी युवक वेदनेने ओरडत होता अन् पोलिस...

Kolhapur Municipal : कोल्हापुरात रस्त्यांची दुर्दशा, शहर अभियंतापदाचा खेळखंडोबा; सव्वा महिन्यात हर्षजित घाटगेंची बदली

SCROLL FOR NEXT