Murder sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : रोजच शिवीगाळ करायचा म्हणून पोटच्या मुलाचा केला निर्घृण खून

२२ सप्टेंबरच्या पहाटे साडेतीनदरम्यान राजू याने आकाशच्या डोक्यात, कानावर धारदार हत्याराने वार करून ठार मारले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मुलगा २४ तास दारूच्या नशेत तर्रर्र, त्यातही कामधंदा न करता मिस्त्रीकाम करणाऱ्या वडिलांना शिवीगाळ करत असे. पत्नीही सणासाठी मुलीच्या घरी गेल्याची संधी साधत पोटच्या मुलावर धारदार हत्याराने वार करत पित्याने निर्घृण खून केला. त्यानंतर पोलिसांत जाऊन माझ्या मुलाचा खून झाल्याचे सांगितले.

मात्र, त्याची हालचाल पोलिसांना स्वस्थ बसू देईना, अखेर खाक्या दाखविताच पित्याने ‘साहेब, ‘तो दारू पिऊन मला आई-बहिणीवर शिव्या द्यायचा, मारहाण करायचा, म्हणून मी मुलाचा खून केला’ अशी कबुली पित्याने छावणी पोलिसांना दिली. ही घटना २१ च्या मध्यरात्री छावणीत घडली होती. राजू शेणफड उफाड (वय ५२, रा. न्यू साईनगर, पडेगाव) असे आरोपी पित्याचे तर आकाश (२४) असे मृत मुलाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू याला पत्नी, दोन मुले आहेत. मोठा मुलगा पदमपुऱ्यात राहतो, तर राजू हा लहान मुलगा मृत आकाश, पत्नी सविता यांच्यासह साईनगरात राहतात. आरोपी राजू हा बांधकामावर मिस्त्रीकाम करून उदरनिर्वाह भागवितो. तर त्याचा मुलगा मृत आकाश हा काहीही कामधंदा करत नव्हता, तो २४ तास दारूच्या नशेत असे.

अन् मुलाच्या खुनाचा केला बनाव

२० सप्टेंबर रोजी राजूची पत्नी महालक्ष्मी सणानिमित्त पुण्‍याला मुलीकडे गेली होती. दोन दिवसांपासून राजू आणि आकाश हे दोघेच बापलेक घरी होते. २१ सप्टेंबररोजी रात्री दोघे जेवण करून झोपले.

२२ सप्टेंबरच्या पहाटे साडेतीनदरम्यान राजू याने आकाशच्या डोक्यात, कानावर धारदार हत्याराने वार करून ठार मारले. पोलिसांना दिलेल्या कबुलीमध्ये आरोपीने मुलगा आकाश याला फावड्याने मारल्याचे सांगितले, मात्र कपाटामागे लपवून ठेवलेला विळा हा धुऊन ठेवल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिस सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

म्हणे मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला

राजूने मुलाचा खून करून पहाटे चारला पदमपुऱ्यात राहत असलेले घरमालक नंदू सोळुंके यांचे घर गाठले. सोळुंकेंना घटना सांगितली, त्यावर सोळुंकेंनी पोलिस ठाण्यात माहिती देण्यास सांगितले, त्यानंतर राजूने क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले. तिथे त्याला छावणी पोलिसांत जाण्यास सांगितले, त्यावरून राजूने छावणी पोलिस ठाणे गाठत मी लघुशंकेसाठी उठल्यानंतर पहाटे साडेतीन वाजता आकाश रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याचा बनाव केला. मात्र, खाक्या दाखविताच पोपटासारखे बोलत खुनाची कबुली दिली. ही कारवाई निरीक्षक कैलास देशमाने, सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले, उपनिरीक्षक गणेश केदार, विशाल बोडखे, प्रमोद देवकते, रावसाहेब जोंधळे, विक्रमसिंह चव्हाण, बाबासाहेब रत्नपारखे, प्रकाश बावस्कर, नामदेव दळवी, नारायण पायघण, सिद्धार्थ थरात, सुमेध पवार, मंगेश शिंदे, शपीक शेख, नवनाथ पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: सुरुवातीच्या कलांनी वाढवली उत्सुकता, राज्यात पुन्हा सत्ता कोणाच्या हातात जाणार?

Gokul Dudh Sangh Administrator Appointed : इतिहासात पहिल्यांदाच गोकुळवर प्रशासक!, सत्ताधारी सतेज पाटील आणि मुश्रीफांना राजकीय धक्का

India Ethanol Policy : आता गाडी धावणार 25 टक्के इथेनॉलवर! पेट्रोलच्या किमतीत होणार बदल? केंद्र सरकार नवी पॉलिसी आणण्याच्या तयारीत

Kapileshwar Tank Wall Collapse : कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळून दोन निष्पाप मुलांचा बुडून दुर्दैवी अंत; कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटणारा

Sunetra Pawar Baramati Bypoll : अजितदादांच्यानंतर सुनेत्राताईंची जबाबदारी! अजित पवारांचे आतापर्यंतचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार, “मॅजिक फिगर” गाठणार

SCROLL FOR NEXT