crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास वीस वर्षे सक्तमजुरी

प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन सहायक निरीक्षक बी. आर. गीते आणि उपनिरीक्षक डी. बी. बारसे

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आठवर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ७० हजार ५०० रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावला. नारायण सुप्पडसिंग मंडावत (वय २०, रा. छत्रपती संभाजीनगर) असे नराधमाचे नाव आहे.

प्रकरणात पीडितेच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार, २८ मे २०१४ रोजी दुपारी फिर्यादी आणि त्यांचे पती असे दोघे बाजारासाठी लाडसावंगी येथे गेले होते. तेव्हा सर्व मुले घरी होती. सायंकाळी दोघे परतले, तेव्हा पीडिता फिर्यादीला पाहून रडू लागली. तिने सांगितले की, दुपारी चारच्या सुमारास पीडिता ही मैत्रिणींसह आरोपी नारायण मंडावत याच्या घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होती.

त्यावेळी आरोपी तेथे आला व त्याने पीडितेचे तोंडे दाबून आपल्या घरात नेले व घराची कडी लावून घेत पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सक्तमजुरी आणि दंडही

प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन सहायक निरीक्षक बी. आर. गीते आणि उपनिरीक्षक डी. बी. बारसे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता ज्ञानेश्वर नागुला/डोली यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवि कलम ३७६ (२) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी,

२० हजार रुपये दंड, कलम ३४२ मध्ये तीन महिने सक्तमजुरी ५०० रुपये दंड, पोक्सोच्या कलम ४ (२) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, कलम ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड आणि कलम ८ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ठोठावलेल्या दंडापैकी ४० हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार बी. एन. जाधव, शीला घुगे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Pandharpur News : ऊस दरावरून पंढरपूरात वाद चिघळला; विठ्ठल कारखान्यावर आमदार अभिजीत पाटील समर्थक विरुद्ध शेतकरी संघटना आमने-सामने

IND vs NZ, 4th T20I: वैभव सूर्यवंशीला बाकावर बसवणं महागात पडलं? आधी फिलिप्सने चोपलं अन् मग गोलंदाजांनी सतावलं; भारताचा न्यूझीलंडकडून दारुण पराभव

India U-19 squad for Asia Cup: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर! ज्युनियर सेहवाग, द्रविडची निवड; India vs Pakistan सामन्यात धुमाकूळ घालण्यास सज्ज

Marathi News Live Updates : दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा दिलासा; सुका चारा आणि मुरघासाचे दर निश्चित

SCROLL FOR NEXT