मटण  sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : जेवणाच्या पार्टीमध्ये मटण जास्त घेण्याच्या कारणावरून केला मित्राचा खून

घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे

राजेश नागरे

सिल्लोड : जेवणाच्या पार्टीमध्ये मटण जास्त घेण्याच्या कारणावरून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा लोखंडी टामीने घाव घालून खून केला. ही घटना धारला (ता. सिल्लोड) येथील शेतशिवारात सोमवारी (ता.२९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी माधव मोटे (रा. धारला, ता. सिल्लोड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, टापूमंडी (जि. खंडवा, मध्यप्रदेश) येथील दोन तरूण मजुरी कामासाठी आले होते. त्यांचे मामा त्र्यंबक सोनवणे यांच्या शेतात ते काम करीत होते. जितेंद्र धृवे व ओमजय जगदीश ठाकूर दोघे मद्य प्राशन करून मटण पार्टी करीत होते. दोघांमध्ये मटण जास्त घेण्यावरून वाद झाला. यामध्ये ओमजय ठाकूर याने जितेंद्र धृवे (वय- ४०) यास लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, कर्मचारी सचिन सोनार, अनंत जोशी, राजेंद्र काकडे, दीपक इंगळे, यतीन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी संशयित आरोपी ओमजय ठाकूर (रा. हादरा, मध्य प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT