Sambhaji Nagar Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : 'वडापाव, गुंगीचे औषध देत घरी नेलं अन् विवस्त्र करत...'; समाजसेवक म्हणवणाऱ्या आरोपीला अटक

वडापाव खाल्ल्यानंतर तरुणीला चक्कर आली. तेव्हा त्याने तुला रिक्षा स्टॅडवर सोडतो म्हणून दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेले.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : शाळेत मुलाखतीला गेलेल्या तरुणीला ओळखीच्या तरुणाने वडापाव व पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन घरी नेले. त्यानंतर तरुणीवर अत्याचार करत अश्लील व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत तब्बल दोन वर्षांपासून अत्याचार करत असलेल्या आरोपीविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सय्यद जावेद सय्यद जफर (३३, रा. रहीमनगर, ग.नं. ३, अल्तमश कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीस तात्काळ अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. पीडितेला शाळेत नोकरीला लावतो असे आमिष दाखवून आरोपी सय्यद जावेद याने ओळख निर्माण केली. त्यातूनच रहेमानिया कॉलनीतील एका शाळेत मुलाखत देण्यासाठी जून २०२१ मध्ये आली होती.

मुलाखत देऊन तरुणी बाहेर पडल्यानंतर आरोपीने तिला वडापाव खाण्यासाठी दिला, त्यानंतर तरुणाने पिण्यासाठी पाणी दिले. मात्र, वडापाव खाल्ल्यानंतर तरुणीला चक्कर आली. तेव्हा त्याने तुला रिक्षा स्टॅडवर सोडतो म्हणून दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेले. घरी गेल्यानंतर तरुणीला विवस्त्र करत व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला सय्यद जावेद हा सतत घरी बोलवत होता.

तरुणी बदनामीच्या भितीने घरी जात होती. घरी गेल्यानंतर जावेद तिच्यावर अत्याचार करत असे, तब्बल दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. शेवटी त्रस्त झालेल्या तरुणीने जिन्सी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक केली. उपनिरीक्षक मिरा चव्हाण करीत आहेत. दरम्यान, आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे.

दरम्यान, आरोपी सय्यद जावेद हा मोठमोठ्या व्यक्तींकडून गोरगरीबांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता. संस्थांकडून मिळालेली मदत गोरगरिबांना वाटत असे. त्यातून सगळीकडे समाजसेवक म्हणून मिरवून घेत होता. प्रत्येकाचे काम करून देण्याचेही आश्वासन आरोपी देत असे, अशी माहिती जिन्सी पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT