sambhaji nagar kannad ambadas danve  esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : या मंदिरात राम नसून केवळ मोदी असल्याची कन्नड येथील सेनेच्या आढावा बैठकीत टीका ; अंबादास दानवे

अंबादास दानवे : कन्नड येथील सेनेच्या आढावा बैठकीत टीका

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : सध्या देशात भगवान श्री रामांच्या नावाने राजकारण सुरू असून मोठ मोठे संत, मठाधिपती यांना टाळण्यात येत असून या मंदिरात राम नसून मोदी असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

कन्नड येथील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बाबरी मस्जिदचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला. तेव्हा एकट्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे ते मान्य केले. राम मंदिराचे सगळे श्रेय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे आहे. मात्र, नाचत भाजपवाले आहेत.

जाणीवपूर्वक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना इडी, सीबीआय, पोलिस, आयकर यंत्रणेची भीती दाखवून नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच्यातून शिवसेना तावून निघेल. शिवसेना पुन्हा तळपेल असा विश्वासही आमदार दानवे यांनी व्यक्त केला. सध्या भारत संकल्प यात्रा सुरू आहे. खर्च शासनाचा आणि प्रचार मात्र भाजपचा हा प्रकार सुरू असून या विषयावर न्यायालयात जाणार असल्याचे दानवे यावेळी म्हणाले.

डॉ.सदाशिव पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर अवचित वळवळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अण्णासाहेब शिंदे, बाबासाहेब मोहिते, शरद शिरसाठ, योगेश पवार, संजय मोटे, सतीश जिवरख, शिवाजी थेटे, दीपक बोडखे, बंटी सुरे, गीताराम पवार, गणेश शिंदे, रूपाली मोहिते, हर्षीली मुठ्ठे, भारत मिसाळ, चंद्रकांत लाडे, रवींद्र आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT