Crop insurance situation in Takali Kolte
Crop insurance situation in Takali Kolte 
छत्रपती संभाजीनगर

साहेब! पीकविमा भरावा तरी कसा? पोर्टलवर गावाचे नावच नाही

नवनाथ इधाटे

फुलंब्री (जि. औरंगाबाद)  : तालुक्यातील टाकळी कोलते या गावाचे नाव पीकविम्याच्या पोर्टलवर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. फळबागांचा पीकविमा काढण्यासाठी १४ जुलै तर इतर पिकाचा विमा ३१ जुलै शेवटची तारीख आहे; पण पोर्टलवर गावाचे नाव नसल्याने पीकविमा भरावा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मागील तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल मका व कपाशी अजून तशीच पडून आहे. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने उसनवारी करून शेतकरी पीकविमा भरण्यासाठी तडजोड करीत आहेत. पीकविमा भरल्यानंतर पिकाचे संरक्षण होत असल्याने
पिकविमापासून मिळणाऱ्या पैशावर शेतकरी सावरू शकतो. अतिवृष्टी, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्ती आल्यास पीकविम्याचे संरक्षण कवच असते; परंतु तालुक्यातील टाकळी कोलते या गावाचे पंतप्रधान पीकविमा योजनेच्या पोर्टलवर नाव येत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी शेततळे केलेले असून,
फळबाग लागवड केलेली आहे.

हक्काचा पीकविमा भरण्यासाठी शेतकरी सीएससी सेवा केंद्र व ऑनलाइन प्रणाली असलेल्या आस्थापनेवर चकरा मारू लागले आहे; मात्र या पीकविम्याच्या ऑनलाइन पोर्टलवर टाकळी कोलते गावाचे नाव येत नसल्याने शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 
  
कृषी विभागाला गांभीर्य नाही 
टाकळी कोलते येथील शेतकरी फळबाग लागवडीचा पीकविमा भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. ऑनलाइन पोर्टलवर नाव नसल्याने कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र, तालुका कृषी अधिकारी दुकाने तपासणीच्या नावाखाली बाहेरच राहत असून, कार्यालयात बसतच नसल्याने शेतकऱ्यांना आल्या पावली घरी परतावे लागत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. 

टाकळी कोलते गावाचे नाव ऑनलाइन पोर्टलवर नाही ही माहिती मिळाल्यानंतर तत्काळ याबाबत वरिष्ठांना कळवले आहे. येत्या तीन-चार दिवसांत सदरील ऑनलाइन पोर्टलवर टाकळी कोलतेचे नाव टाकले जाणार आहे. 
- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार फुलंब्री 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT