aurnagabad sakal
छत्रपती संभाजीनगर

अतिवृष्टीने मराठवाड्यात ८४५ कोटींचे नुकसान

मधुकर कांबळे

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Cyclone) झालेल्या तुफानी पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. यापावसामुळ सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने दहा लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पीकांचे नुकसान केले आहे याशिवाय जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नुकसानीतुन मराठवाड्याला (Rain) सावरण्यासाठी सुमारे ८४५ कोटी ७९ लाख रूपयांच्या मदतीची गरज असल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास यंदा निसर्गाने हिरावुन घेतल. सप्टेबरमध्ये मराठवाड्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली होती. तर गेल्या दोन दिवसात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमूग आदी पिके होत्याची नव्हते केले. कपाशी, मका, उस, मोसंबी, बाजरी आडवी झाली. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून मुळ्या कुजत आहेत , पिके पिवळी पडत आहेत. नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने पीकासह जमीन खरवडून गेली. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाने सोमवार (ता. २७ ) आणि मंगळवारी (ता. २८ ) झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची आकडेवारी आणि त्यासाठी अपेक्षित निधी याबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे. दोन दिवसात आठही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यासोबत जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि अनेक घरांची पडझड झाली. मराठवाड्याला नुकसान भरपाईसाठी अपेक्षित निधी किती लागेल, याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळाने आणलेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसाने विभागातील १२ लाख ३ हजार ९५८ शेतकऱ्यांच्या १० लाख ५६ हजार ८४८ हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. यासाठी तब्बल ७१० कोटी १५ लाख ६३ हजार ४०० रूपयांच्या अर्थिक मदतीची गरज भासणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १०४ गावांचा संपर्क तुटलेला आहे तर नऊ गावे पुराच्या वेढयात आहेत त्याठिकाणी प्रशासनाकडून मदत केली जात आहे. ७७७ लोक पुरात अडकले होते, त्यातील काहींना प्रशासनाच्यावतीने तर काहींना स्थानिक नागरिकांच्या वतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पावसाने सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान केले आहे. जिल्हा परिषदेची एक शाळा पडली आहे. १७ तलाव फुटले आहेत. २९३ ठिकाणी महावितरणची नुकसान झाले आहे. दोन दिवसात पावसाने ८४५ कोटी ७९ लाख ६१ हजार ७१२ रूपयांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज अहवाल तयार करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT