Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

कारच्या धडकेत भारतीय जवान ठार, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

कुणी नसल्याचे पाहुन कार चालकाने मोठ्या शितीफीने कारच्या दोन्ही बाजूच्या नंबरप्लेट काढून घटनास्थळावरून पोबारा केला.

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या दुचाकीस समोरुन चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील सीमा सुरक्षा बलाचा जवान जागीच ठार झाला. ही घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील डोमेगाव फाट्याजवळ गुरुवारी (ता.२०) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. यासंबंधी अधिक माहीती अशी, सीमा सुरक्षा बलाचा जवान (बीएसएफ) राजेंद्रगिर शामगिर गिरी (वय ४५, रा.शिवराई, जि.औरंगाबाद) (Aurangabad) हे आपल्या दुचाकीवरुन (एमएच २o एएक्स ५०३८) बीडकडुन औरंगाबादला येत असताना धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील डोमेगाव फाट्याजवळ समोरुन चुकीच्या दिशने येणाऱ्या भरधाव वेगातील कारने जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार राजेंद्रगिर गिरी हे जागीच ठार झाला. (CRPF Jawan Died In Accident On Dhule-Solapur National Highway In Aurangabad)

हा अपघात समोरासमोर होऊन कारच्या समोरील भागाचा तर दुचाकीचा पुर्णतः चुराडा झाला. हा अपघात झाल्यानंतर आजुबाजूला कुणी नसल्याचे पाहुन कार चालकाने मोठ्या शितीफीने कारच्या दोन्ही बाजूच्या नंबरप्लेट काढून घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान महामार्गालगत शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनी पोलिसांसह भोकरवाडी टोलनाक्यावरील रुग्णवाहिका चालकास या घटनेची मोबाईलवरून माहीती दिली. (Aurangabad Accident)

ही माहीती मिळताच रूग्णवाहिका कर्मचारी महेश जाधव, गणेश चेडे, आत्माराम गाडेकर, रवी गाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन राजेंद्रगिर गिरी यास पाचोडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी त्यांस तपासूून मृत घोषित केले. या घटनेची नोंद उशिरापर्यत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT