sambhaji nagar university  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वी ‘डीसीपीएस’ तर आता ‘नवीन पेन्शन योजना’ लागू ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २२५ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर’ अर्थात ‘प्राण’ क्रमांक देण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एक नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वी ‘डीसीपीएस’ तर आता ‘नवीन पेन्शन योजना’ लागू करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २२५ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर’ अर्थात ‘प्राण’ क्रमांक देण्यात आला आहे. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी (ता.१९) प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, कुलसचिव दिलीप भरड, प्र.वित्त व लेखाधिकारी डॉ. संजय कवडे, सामान्य प्रशासनाचे अधिकारी डॉ. कैलास पाथ्रीकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, डॉ. बी. एन. डोळे, उपकुलसचिव डॉ. आय. आर. मंझा, डॉ. गणेश मंझा, माधव वागतकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

काय आहे ‘प्राण’?

३१ ऑक्टोबर २००५ पर्यंत सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती योजना लागू आहे तर १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ‘डिफाइन क्वांट्रॅक्टच्युअल पेन्शन स्कीम’ अर्थात ‘डीसीपीएस’ लागू होती. सध्या ‘नवीन पेन्शन योजना’ लागू करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना ‘प्राण’ प्राप्त झाला असून त्यानुसार त्यांना निवृत्तिवेतन मिळणार आहे. यावेळी प्राथमिक स्वरूपात डॉ. भास्कर साठे, डॉ. एस. जी. शिंदे, योगेश थोरात, पंकज बेडसे, डॉ. मीरा शिंदे, रवींद्र खताळ, मनोज शेटे, अमोल शेळके आदींना ‘प्राण’ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कुलसचिवांना निरोप

प्रभारी कुलसचिव दिलीप भरड हे यांची निवड नाशिक विद्यापीठाच्या कुलसचिवपदी करण्यात आली आहे. त्यांना विद्यापीठाच्या वतीने निरोप देण्यात आला. डॉ. गोसावी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन भरड यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. पाथ्रीकर यांनी प्रास्ताविक, संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर अनिल खामगावकर यांनी आभार मानले.

आता कोठेही काम करू शकतो : कुलगुरू

पुण्यात जो वाहन चालवू शकतो तो जगात कुठेही चालवू शकतो असे म्हटले जाते. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जो यशस्वी प्रशासन चालवेल, तो जगात कुठेही काम करू शकतो, असे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले. मराठवाड्यातील छोटीशी कारकीर्ददेखील मोठा अनुभव देणारी ठरेल, अशा विश्वास डॉ. गोसावी यांनी व्यक्त केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT