जात वैधता प्रमाणपत्र Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : जात वैधता प्रमाणपत्रासाठी वर्षाची मुदत

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काढले आदेश

सुनील इंगळे

औरंगाबाद : राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची अट राज्य निवडणूक आयोगाने घातली होती. आता ती शिथिल करत आयोगाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षांची मुदत दिली आहे. यासाठी उमेदवारांना हमीपत्र सादर करावे लागेल. आयोगाने यासंदर्भात सोमवारी (ता.६) ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे.

‘निवडणूक लढवायची? आधी जातवैधता द्या’! या मथळ्याखाली ‘सकाळ’ने अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांची व्यथा मांडली होता. तर ‘जात वैधता मुदत वाढीचे निघणार परिपत्रक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून मागासवर्गीय उमेदवारांना दिलासा मिळणार असे भाकीत केले होते. ते खरे ठरले आहे. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्जांसोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केल्याबाबतचा किंवा अन्य कोणताही पुरावा, निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना दिली आहे.

२१ डिसेंबरला मतदान

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे. या दिवशी दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मदतान होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबरला मतमोजणी, निकाल जाहीर होणार आहे.

हमीपत्रासाठी आज दुपारपर्यंत मुदत

राज्यात १७ नोव्हेंबरला ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. इच्छुकांना ३० नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी (ता. ७) अर्जांची छाननी होणार आहे. जातवैधता प्रमाणपत्राबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्याची मुदत दुपारी १२ पर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT