Death of Mother and Daughter at Murshidabadwadi
Death of Mother and Daughter at Murshidabadwadi 
छत्रपती संभाजीनगर

फुलंब्री : अरे बाप रे! सकाळी आई अन् दहा वर्षांची मुलगी पडली घराबाहेर, मग...

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथील एका ३५ वर्षीय महिलेसह तिच्या दहावर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला. ही दुदैवी घटना मंगळवारी (ता. २६) सकाळी आठ वाजता उघडकीस आली. सुनीता राजू विटेकर (वय ३५) आणि श्रद्धा राजू विटेकर (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. 

मुर्शिदाबादवाडी येथील सुनीता आणि श्रद्धा या दोघी मायलेकी मंगळवारी सकाळी घराच्या बाजूला असलेल्या गट नं. ३१ मधील विहिरीकडे गेल्या होत्या. थोड्या वेळानंतर दोघीही घराकडे परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा नातेवाइकांनी शोध घेतला असता, या मायलेकीच्या चप्पल विहिरीच्या काठावर आढळून आल्या. ग्रामस्थांनी विहिरीत जाऊन शोध घेतला असता, त्या दोघीही पाण्यात आढळून आल्या. या घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, बीट जमादार अंकुश बागल यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 
  
अपघात की आत्महत्या? 
महिलेने मुलीला विहिरीत ढकलून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे. दरम्यान, मुलगी विहिरीत पडल्याने तिला वाचविण्यासाठी आईने उडी टाकली असावी, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या? या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. 
  
सासूचा महिनाभरापूर्वीच झाला मृत्यू 
सुनीता यांची सवत आठ वर्षांपूर्वी घरातून बेपत्ता झाली. तिचा अद्याप शोध लागलेला नाही. महिनाभरापूर्वी सुनीता यांच्या सासूचे निधन झाले आहे. आता मायलेकीचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

मोबाईलचे दुकान फोडणारे दोघे अटकेत 
 

औरंगाबाद : मोबाईलचे दुकान फोडून दीड लाखाचे मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. अनिल सोमिनाथ शिंदे (२२, रा. जिकठाण, आंबेडकर चौकाजवळ, ता. गंगापूर) आणि सोमिनाथ दामू जाधव (२३, रा. जटवाडगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार बबन ऊर्फ जबऱ्या भागाजी मकळे हा पसार आहे. 

सिडको, एन-पाच, कॅनॉट प्लेसच्या साई आर्केडमधील इनलीड इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. व ओपो सर्व्हिसिंग सेंटर बंद होते. याकाळात अनिल शिंदे, सोमिनाथ जाधव व अट्टल गुन्हेगार जबऱ्या यांनी मोबाईल शॉपीचे शटर उचकटून त्यातील दीड लाखाचे मोबाईल लांबविले. हा प्रकार २१ मे रोजी उघडकीस आल्यावर मीर अस्लम बेग (रा. सादातनगर, रेल्वेस्टेशन) यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिसात गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचत सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आमखास मैदानाजवळ मोबाईलची विक्री करण्यासाठी आलेल्या अनिल शिंदे व सोमिनाथ जाधव यांना पकडले. यावेळी दोघांनी मोबाईल शॉपी फोडल्याची कबुली देत ६५ हजारांचे मोबाईल पोलिसांना दिले. तर त्यांचा साथीदार जबऱ्या पसार असून, उर्वरित मोबाईल त्याच्याकडे असल्याचे सांगितले. या दोघांना गुन्हे शाखेने सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT