deatha 
छत्रपती संभाजीनगर

बापरे... अचानक का वाढला औरंगाबादेत मृत्यूदर 

माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात एकीकडे कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे, तर दुसरीकडे ‘सारी’चे (सिव्हीअरली अ‍ॅक्यूट रेस्परेटरी इलनेस) बळी वाढत आहेत. त्यामुळे मृत्युदराने अचानक उसळी घेतली आहे. चार महिन्यांच्या तुलनेत तब्बल सव्वाशे ते दीडशेहून अधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात ९१५ जणांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेची आकडेवारी सांगते. 

शहरात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची आकडेवारीदेखील दिलासादायक आहे. महापालिकेला एकीकडे ‘कोरोना’, तर दुसरीकडे ‘सारी’च्या आजारावर उपाययोजना करावी लागत आहे. कोरोनाने आतापर्यंत ८८ जणांचा, तर सारीने १७ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शहराच्या मृत्युदरात मे महिन्यात अचानक मोठी वाढ झाली आहे.

प्रत्येक महिन्याला शहरात सरासरी सातशे ते आठशे जणांचा मृत्यू होतो. जानेवारी महिन्यापासून सरासरी सहाशे ते सातशे जणांच्या मृत्यूची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे; मात्र मे महिन्यातील मृत्यूचा आकडा ९१५ एवढा झाला आहे. काही दिवसांपासून कोरोना व सारीच्या आजाराची भीती शहरातील प्रत्येकाच्या मनात भरली आहे. शहराच्या प्रत्येक भागात या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर वाढला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. मे महिना म्हणजे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे वृद्ध, आजारी व्यक्तींना त्रास जाणवतो. म्हणून मे महिन्यात एरवी मृत्युदर जास्तच असतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 


यावर्षी झालेले मृत्यू 
जानेवारी ः ७४९ 
फेब्रुवारी ः ६७८ 
मार्च ः ६३७ 
एप्रिल ः ६२१ 
मे ः ९१५ 
जून (आतापर्यंत) ः ९३ 

गेल्या महिन्यात मृत्युदर वाढला आहे; मात्र तो ‘कोविड-१९’मुळे वाढला आहे, असे म्हणता येणार नाही. शहरात प्रत्येक महिन्याला सरासरी ७०० ते ८०० एवढ्या मृत्यूची नोंद होते. मे महिन्यात मृत्यूचे प्रमाण थोडे जास्त आहे. त्यात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा देखील समावेश आहे. 
नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Property: हे कोणालाही अपेक्षित नव्हतं! मुंबईत एवढ्या वेगाने घरे का विकत घेत आहेत? प्रॉपर्टी मार्केटने मोडले सर्व रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : कामठी निवडणुकीत बोगस मतदार प्रकरणामुळे खळबळ

MLA Amol Khatal: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा महाविजय निश्चित : आमदार अमोल खताळ; विकासाची गती तीन पटीने वाढली

Balasaheb Thorat : ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात: बाळासाहेब थोरात; आयोगाचे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम !

स्मृती मंधाना अन् पालाश मुच्छलचा विवाह ७ डिसेंबरला होणार? कुटुंबातील सदस्याने दिली महत्त्वाची अपडेट...

SCROLL FOR NEXT