Sambhajinagar News  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : वयोवृद्ध आजी - आजोबांची नवसाक्षरताची परीक्षा..!

फुलंब्री : पिंपळगाव गांगदेव येथे उल्लास नवभारत साक्षरता उपक्रम, केंद्र शासनाने उल्लास नवभारत साक्षरता उपक्रम जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नवनाथ इधाटे पाटील

फुलंब्री : केंद्र शासनाने उल्लास नवभारत साक्षरता उपक्रम जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव जिल्हा परिषद शाळेत सात वयोवृद्ध महिला व एक पुरुष असे एकूण आठ जणांनी नवसाक्षरतेची परीक्षा दिली. यात आजी आजोबांनी नवसाक्षरतेची परीक्षा दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

2011 च्या जनगणनेनुसार देशातील निरक्षरांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. 2023 ते 2027 अशा या पाच वर्षाच्या कालावधीत देशात एकही निरक्षर राहणार नाही असा महत्त्वाकांक्षी केंद्र शासनाचा हा कार्यक्रम आहे. मागील चार महिन्यापासून प्रत्येक गावात निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना शिकवण्यासाठी स्वयंसेवक नेमलेले आहेत.

या निरक्षराना मागील चार महिन्यात काय शिकवले त्याचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने अशा या निरक्षरांची आज पहिल्या टप्प्यात एक परीक्षा आयोजित करण्यात आली. वयोगट 15 वर्षांपुढील देशातील प्रत्येक नागरिकास पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या किमान क्षमता सर्वांना प्राप्त व्हायलाच पाहिजे या उदात्त हेतूने केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव गांगदेव येथे आज आयोजित करण्यात आली. पिंपळगाव गांगदेव परिक्षाकेंद्रावर 07 महिला व 01 पुरुष अशा नवसाक्षरांनी परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर सर्व परीक्षार्थींना "वाचनाई" हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. केंद्र संचालक म्हणून बाबासाहेब मंदाडे यांनी काम पाहिले तर पर्यवेक्षक म्हणून श्री. मैंदाड, श्रीमती.राजहंस यांनी आपापली जबाबदारी पार पाडली.

पंचायत समिती फुलंब्री शिक्षण विभाग येथून परीक्षाकेंद्रावर ए.टी. गायकवाड यांनी भेट दिली. परीक्षा केंद्र सुरळीत चालण्यासाठी, परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी पिंपळगावचे सरपंच अंबादास गायके, उपसरपंच भाऊसाहेब काळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेखा भगवान काकडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT