Demand to start hotel business, tourism sector Aurangabad News
Demand to start hotel business, tourism sector Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

पर्यटनाचा गावगाडा सुरु होईना ; हॉटेल व्यावसायीक हतबल

प्रकाश बनकर

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यापासून जिल्‍ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळेही बंद आहेत. केंद्र सरकारने काही नियम घालून देत ताजमहल पर्यटकांसाठी खुला केला आहे. त्याच धरतीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्र सुरु कराण्याची मागणी जोर धरत आहे. 

जिल्ह्याच्या पर्यटनावर हॉटेल व्यावसायिकांचा चारितार्थ अवलंबून आहे. अर्धे वर्ष विना कमाईचे गेले आहे. आता तरी पुढील नुकसान टाळण्यासाठी नियम घालून देत पर्यटन व रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी हॉटेल असोसिएशनतर्फे करण्यात येत असल्‍याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मनगटे यांनी दिली.

कोविड-१९ मुळे सर्वजग ठप्प झाले आहे. केंद्र व राज्य सरकारतर्फे अनलॉकच्या माध्यामातून हळूहळू सर्व क्षेत्र सुरु केले जात आहे. मात्र राज्यात पर्यटन व धार्मिक स्थळे अद्यापही सुरु करण्यात आले नाही.

या दोन्ही क्षेत्रावरच जिल्‍ह्यातील हॉटेलिंग व्यवसाय अवलंबून आहे. हॉटेलतर्फे दरवर्षी वेगवगळ्या परवान्याच्या माध्यामातून कोट्यावधीचा महसूल सरकारला मिळतो. यंदाही १८५ छोटे-मोठे हॉटेलचालकांनी वेगवेगळ्या परवानाची फीस भरली आहे. फीस भरूनही सहा महिने हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे सरकारने पर्यटना विषयी नियमावली करून हे क्षेत्र आता खुले केले पाहीजे अशी व्यावसायीकांची अपेक्षा आहे.

स्थानिक पातळीवर महापालिका प्रशासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी हॉटेल व्यवसायिकांना मालमत्ता व पाणीपट्टीत सुट द्यावी अशी मागणी करण्यात येत असल्याचेही श्री, मनगटे यांनी सांगितले. 

पर्यटनावर सर्वच हॉटेल व्यावसायीक अवलंबून आहे. त्यामुळे सरकारने नियमाचे बंधन घालून, पर्यटनस्थळे सुरु करावीत. पुढील महिन्यापासून पर्यटनाचा हंगाम सुरु होणार आहे. राज्यातील पर्यटकांचाही ओघ सुरु झाला तर या क्षेत्राला सावरण्यास मदत होणार आहे. 
- शिवाजी मनगटे, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन, 

पर्यटनक्षेत्र सुरु व्हावेत यासाठी पालकमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक आला आहे. एवढे नव्हे तर पर्यटन क्षेत्र सुरु झाल्यावर पर्यटक कसा येईल यासाठीही प्रयत्न केले पाहिजे. औरंगाबाद फस्टचे मानसिंग पवार यांच्यासह पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. 
- जसवंतसिंग राजपूत, अध्यक्ष, टुरिझम डेव्हल्पमेट फोरम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT