व्यसनमुक्ती.jpg
व्यसनमुक्ती.jpg 
छत्रपती संभाजीनगर

आता सोळावं नव्हे, पंधरावं वरीसच धोक्याचं !  

मनोज साखरे

औरंगाबाद : संगत चुकीची लागली की मुलांचा रस्ताही भरकटतो असे आपल्याकडे म्हटले जाते. अशातूनच मुले वाईट प्रवृत्तीकडे वळतात. बदलता जीवनस्तर, सामाजिक, आर्थिक स्थितीसह विविध कारणांमुळे पंधरा ते सोळाव्या वर्षीच मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याची बाब समुपदेशकांकडून सांगण्यात आली. एका अहवालानुसार, देशातील १.३ टक्के मुले मद्यपान करीत असल्याचे दिसून आले आहे. 


पंचविशीतील तरुण व्यसनाच्या आहारी जाण्याचा स्तर आता पंधराव्या वर्षावर आला आहे. हे व्यसनमुक्ती केंद्रात व समुपदेशकांकडे व्यसन सोडविण्यासाठी येणाऱ्या बालवयातील मुलांवरून स्पष्ट होते. त्यामुळे व्यसनाधीनतेचा विळखा मुलांना जास्त बसत असल्याचेही समुपदेशक सांगतात. घरातील वातावरण व कुटुंबातील व्यक्तींच्या स्वभाव व वर्तवणुकीवर मुलांचे भवितव्य अवलंबून असते. व्यसन करणे हे काही कुटुंबांत सवयीचे व सामान्य झाले. त्यातूनही मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. 

ही आहेत व्यसनाची कारणे 
-कुसंगती, गरिबी, बेरोजगारी, शिक्षण, बदलती जीवनपद्धती. 
-मूल्यशिक्षण व उच्चदर्जाच्या शिक्षणाचा अभाव. 
-भोवतालचे पोषक नसलेले सामाजिक वातावरण. 
-शिक्षणात अपयश, नैराश्‍य, झटपट पैशांसाठी प्रयत्न, अपेक्षाभंग 
-विकास व प्रगत समाज जीवनापासून वंचितपण. 
-चैन, विलासी, बदलत्या जीवनपद्धतीचा अंगीकार. 


हे करा... 
-मुलांच्या सवयी, वर्तणुकीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 
-मुलांना दिलेल्या पॉकेटमनीचा योग्यप्रकारे वापर होतो का? 
-इंटरनेट, मोबाईलचा वापर योग्यप्रकारे होतो का? 
-मुलांना वाचन, खेळ, इतर छंद असतील तर ती व्यसनापासून दूर राहतील. 
-मुलांना आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम आहे, याची जाणीव व्हावी. 

हे आहेत अमली पदार्थ 
कोकेन, मेथाएम्फेटामीन, रिटालीन, साइलर्ट, इन्हेलंट, हिरॉईन, मार्फीन, गांजा, अफू, मद्य, यासह विविध नशा व गुंगीकारक ड्रग्ज. शिवाय विविध प्रकारची मद्य, हातभट्टी, गावठी दारू, ताडी, भांग यांचाही नशाकारक पदार्थांमध्ये समावेश होतो. 

एका अहवालानुसार देशातील स्थिती 
-१६ कोटी व्यक्ती मद्यसेवन करतात. 
-१० ते ७५ वयोगटातील १४.६ टक्के व्यक्ती मद्यपान करतात. 
-२७.३ पुरुष व १.६ टक्के महिला व १.३ टक्के मुले मद्यपान करतात. 
-इंजेक्‍शनद्वारे महाराष्ट्रात ४४ हजार ३२३ व्यक्ती ड्रग्ज घेतात. 
-देशात हेच प्रमाण आठ लाख ५४ हजार २९६ एवढे आहे. 
-महाराष्ट्रात १०.२ टक्के व्यक्ती मद्यपान करतात. 

(संपादन-प्रताप अवचार) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT