Aurangabad sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : दिवशी पिंपळगावाला फार्म हाऊसमध्ये चालणाऱ्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा

हाय प्रोफाइल जुगार पकडून १ कोटी ८१ लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त.

सकाळ वृत्तसेवा

लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपंळगाव शिवारातील एका फॉर्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या पत्त्यांच्या जुगारावर छापा टाकून शिल्लेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. तब्बल पंचवीस लाखांवर रोख रक्कम जप्त केली असून एक कोटी 82 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली.

शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवशी पिंपळगाव येथील मनोजकुमार फुलचंद दगडा यांचा फार्म हाऊस असून तेथे पत्त्यावर जुगार खेळ खेळत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली त्यावरून पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोडे, गंगापूरचे डीवायएसपी प्रकाश बेले, शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, फौजदार ठुबे संयुक्त कारवाई करून या फार्म हाऊस वर छापा टाकला.

यावेळी संशयीत आरोपी पुनम सिंग सुनील ठाकूर (वय 33) (रांजणगाव, औरंगाबाद, राहुल सुरेश परदेशी (वय 33) पदमपुरा, औरंगाबाद, गणेश रावसाहेब पोटे (वय 28) नागेश्वरवाडी, औरंगाबाद,'अभिषेक वसंतकुमार जैन (वय 38) वर्धमाननगर,जालना, कुणाल दिलीपकुमार बाकलीवाल, शहागंज, औरंगाबाद, संदीप सुधाकर लिंगायत (वय 37) चेलीपुरा,औरंगाबाद,;मनोजकुमार फुलचंद दगडा (वय 46). सिडको N 9 औरंगाबाद यांचेवर कारवाई केली.

या कारवाईतील मुद्देमालात पाच व्हीआयपी चारचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT