corona 
छत्रपती संभाजीनगर

हॅलो... तुम्हाला मदतीची गरज आहे का? औरंगाबादेत कोण करतेय फोन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना सुरू आहेत. ५० वर्षांवरील नागरिकांची ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपवर नोंद घेतली जात आहे. यातील ज्यांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी आहे व जे डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात, अशांना वॉर रूममधून फोन करून मदत केली जात आहे. आत्तापर्यंत १,६५२ जणांना कॉल करण्यात आले तर १,३५६ जणांना मदत करण्यात आली. १२ जण या ठिकाणी चोवीस तास काम करीत आहेत. 

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वर्षांवरील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून महापालिकेतर्फे ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ अॅप तयार केले आहे. या अॅपवर खासगी कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून माहिती भरून घेतली जाते. ऑक्सिमीटरच्या साहाय्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण व थर्मलगनच्या मदतीने ताप मोजला जातो.

ऑक्सिजनचे प्रमाण कमी असेल व ताप असेल तर असे नागरिक रेड झोनमध्ये टाकले जातात. जे नागररिक रेड झोनमध्ये जाऊ शकतात, त्यांची वेगळी नोंद केली जाते. या दोन्ही प्रकारांतील नागरिकांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली आहे. अॅपवर माहिती पडताच येथील कर्मचारी ‘हॅलो, मी महापालिकेतून बोलतोय... तुमची प्रकृती कशी आहे? तातडीने तुम्हाला उपचाराची गरज आहे. आमचे वैद्यकीय अधिकारी तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही डॉक्टरांकडे जा’ असा सल्ला दिला जातो. एखाद्याने उपचाराची तयारी दर्शविताच त्या भागातील वैद्यकीय अधिकाऱ्याला माहिती दिली जाते. तास-दीड तासात वैद्यकीय अधिकारी संबंधिताच्या मदतीला पोचतो. 
 
अडीचशे जण डेंजर झोनमध्ये 
‘एमएचएमएच’ अॅपद्वारे झालेल्या सर्वेक्षणानुसार २४९ जण डेंजर झोनमध्ये आढळून आले. त्यांना वॉर रूमच्‍या माध्यमातून तातडीने मदत झाली. तसेच डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात अशा ४४१ नागरिकांचा समावेश आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आरोग्य सेतूवरूनही मदत 
केंद्र शासनाने कोरोनासंदर्भात आरोग्य सेतू अॅप सुरू केले आहे. त्यावरूनदेखील महापालिकेला माहिती कळविली जाते. त्यानुसार महापालिकेने ४४४ जणांना मदत करण्यासाठी वॉर रूमच्या माध्यमातून मदत केल्याचे वॉर रूमचे प्रमुख अविनाश बरंडवाल यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT