Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत डॉक्टरने काढली महिला रुग्णाची छेड

या प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

रामराव भराड

या प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

वाळूज: रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी डॉक्टरला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता.३) जोगेश्वरीत घडली. या प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळूज परिसरातील १९ वर्षीय विवाहित महिला कान दुखत असल्याने गुरुवारी (ता. २) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सासू सोबत जोगेश्वरी येथील डॉ. नागेश शेजवळ यांच्या खासगी रुग्णालयात गेली होती. तेथे गेल्यानंतर डॉ. नागेश शेजवळ यांनी त्या महिलेची तपासणी करून औषधाची चिठ्ठी लिहून तिच्या सासूला मेडीकलमध्ये औषधी आणण्यासाठी पाठवले. महिलेची सासू मेडीकलमध्ये गेल्यानंतर डॉ. नागेश शेजवळ याने महिलेला इंजेक्शन देण्याचा बहाणा करत तिच्या मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले.

या प्रकारामुळे घाबरलेली महिला घरी निघून गेली. महिलेने या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. दरम्यान, शुक्रवारी (ता.३) रोजी दुपारी पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर पीडित महिलेने दवाखान्यात घडलेल्या प्रकाराची माहिती पतीला दिली. त्यामुळे तिच्या पतीने नातेवाईक व गावातील नागरिकांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान नातेवाईक व गावातील काहीजण दवाखान्यात डॉ. शेजवळ यांना जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, या प्रकाराची कुणकूण लागताच डॉ. शेजवळ याने दवाखान्यातून पळ काढला.

जमावाने डॉ. शेजवळ याचा पाठलाग करून पकडून त्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डॉ. नागेश शेजवळ यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डॉ. नागेश शेजवळ याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अधाणे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT