help during covid 19 help during covid 19
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus| व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध केले जाताहेत डॉक्टर

कोरोनाच्या संकटात व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध केले जाताहेत डॉक्टर

शेखलाल शेख

औरंगाबाद: कोरोनाच्या संकटात (covid 19) अनेक कोविड केअर सेंटर, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची कमरता आहे. ज्या ठिकाणी डॉक्टर हवे आहेत अशा हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरची माहिती सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून उपलब्ध करुन डॉक्टर उपलब्ध केले जात आहे. कोरोनाच्या काळात संकटात आरएमओ जॉब्स ॲण्ड लोक्मस या व्हाट्सअप ग्रुपने डॉक्टर उपलब्ध करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

डॉ. एजाज खान यांनी २०१८ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांनी औरंगाबादेतील (aurangabad latest news) तसेच मराठवाड्यातील डॉक्टरांचा आरएमओ जॉब्स ॲण्ड लोक्मस हा ग्रुप तयार केला. यामध्ये डॉक्टर, सीएमओ, आरएमओ, आयसीयु, अपघात विभाग यांची सेवा, इतर जिल्ह्यातील डॉक्टरांची पदे, भरती त्यांच्या रिक्त जागा याची माहिती विनामूल्य उपलब्ध केली जाते. यात डॉ. रियाज खान यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले.

कोरोनात डॉक्टर उपलब्धतेसाठी मदत
हॉस्पीटल आणि कोविड सेंटरची माहिती घेऊन डॉ. रियाज यांनी या ग्रुपमध्ये टाकली तसेच डॉक्टरांशी संपर्क करुन डॉक्टर उपलब्ध करुन दिले. यामध्ये काही डॉक्टरांनी आपली ओपीडी बंद करुन कोविड सेंटरमध्ये सेवा देण्यास सुरवात केली. यामध्ये एका ग्रुपच्या ऐवजी त्यांनी मराठवाड्यातील डॉक्टरांचे दोन ग्रुप तयार केले. त्यातून डॉक्टर थेट त्या हॉस्पीटल, कोविड सेंटरशी संपर्क करुन सेवा देतात.

मी सध्या नूतन कॉलनीच्या ब्रेन हॉस्पिटलमधील हायटेक आधार कोविड केअर सेंटर मध्ये सेवा देत आहे. माझ्या डॉक्टर उपलब्ध करुन देण्याच्या कामासाठी माझा वैद्यकीय शिक्षण घेत असलेला भाऊ अरबाज खान सुद्धा मदत करतो. आम्ही आमची ही सेवा अगदी मोफत करतो. आमच्या या सोशल मिडीयाच्या कामामुळे अनेक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झाले आहे
- डॉ. एजाज खान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT