amol gite sakal
छत्रपती संभाजीनगर

आपत्तीकाळात वादात सापडलेले डॉ. गिते बीडला ‘डीएचओ’

वाहनात पैसे व दारू आढळल्याने दाखल होता गुन्हा; ‘सकाळ’चा पाच महिन्यांपूर्वीचा अंदाज ठरला खरा

सकाळ वृत्तसेवा

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेवेळी भयान परिस्थितीत खासगी वाहनात पैसे व दारू सापडल्याने पोलिसांत गुन्हा नोंद होऊन अटक व्हावे लागलेल्या डॉ. अमोल गिते यांची जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नेमणूक झाली.शुक्रवारी (ता. २१) सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील १६ आणि जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले. यात तत्कालीन जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर डॉ. अमोल गिते यांची नेमणूक झाली.

सध्या ते औरंगाबाद येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य पदावर कार्यरत होते. दरम्यान, ‘सकाळ’ने पाच महिन्यांपूर्वी (ता. १५ ऑगस्ट २०२१) बीडसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी डॉ. अमोल गिते यांचे नाव असल्याचा वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. तर, कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत टीका झाल्याने तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांची लोखंडी सावरगाव येथील मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्रात भिषक म्हणून नेमणूक केली होती. आता या आदेशात त्यांची जिल्हा रुग्णालयात प्रशासकीय कारणास्तव भिषक म्हणून नेमणूक करण्यात आली.

नेमका काय होता वाद डॉ. गितेंबाबत

डॉ. अमोल गीते औरंगाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने विविध उपाय योजना आणि कडक लॉकडाऊन असताना डॉ. गिते खासगी वाहनातून जालन्याकडे जात असताना पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.

यावेळी वाहनात सहा लाख सात हजार रुपये व विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. यावरुन त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याने गुन्हा नोंद होऊन अटक झाली होती. त्यामुळे त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरून औरंगाबादच्याच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदावर नेमणूक झाली होती. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत उपचार नियोजन विस्कळित झाल्याची टीका तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्यावर झाली. त्यामुळे त्यांची लोखंडीच्या मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्रात भिषक म्हणून नेमणूक करून माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे सात महिन्यांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार देण्यात आला. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील उपचार नियोजन व प्रशासनात सुधारणा करण्याबरोबरच विविध उपक्रमांतही यशस्वी पुढाकार घेतला. अधिनस्थ रुग्णालयांनाही शिस्त लावत आंतररुग्ण व बाह्य रुग्णांची संख्या वाढविण्यात यश मिळाले. अनेक अवघड शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आता त्यांच्या नेमणूकीकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT