Drawing of Ritika Vedpathak
Drawing of Ritika Vedpathak 
छत्रपती संभाजीनगर

करिना कपूर, नाना पाटेकरांनी केले औरंगाबादच्या रितिकाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी येथील रितिका वेदपाठक ही चित्रांमधून जनजागृती करीत आहे. शिवाय कोराना योद्ध्यांबद्दल तिने चित्रांमधून कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे. रितिकाला वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच चित्रकलेची आवड होती. त्यामुळे तिच्या आईने वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिला चित्रकलेचा क्लास लावला.
तिला आनंद पाटील आणि स्वाती पाटील मार्गदर्शन केले. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिला. सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि करिना कपूर यांनीही तिच्या कलेचे कौतुक केले आहे.

कला माणसाला जगायला शिकवते. मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार ज्यातून दिसून येतो ती म्हणजे कला. अशीच कला रितिकाच्या अंगी आहे. लहानपणापासून रितिकाला चित्रकलेची आवड आहे. पाचव्या वर्षांपासून ती चित्र काढत असे, घरातील भिंती विविध चित्र, आकारांनी भरत होत्या. तिची ही आवड ओळखून तिच्या आईने वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिला
चित्रकलेचा क्लास लावला. तिला आनंद पाटील व स्वाती पाटील हे उत्तम गुरू लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे रितिकाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. तिच्या चित्रांचे रंग फुलत गेले.

तिने विविध चित्रे काढण्यास सुरवात केली. वयाच्या तेराव्या वर्षी तिने नाना पाटेकर आणि करिना कपूर यांचे हुबेहूब चित्र काढले. ते त्यांना भेट केले. रितिकाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. आतापर्यंत तिने सात चित्र प्रदर्शनात भाग घेतला आहे. सध्या कोरोनामुळे असलेल्या लॉकडाउन काळामध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींचे चित्र काढून त्यांना तिने आनंदीत केले; तसेच महाराष्ट्राला सतत धीर देणारे, सतर्क ठेवण्यासाठी झगडणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोट्रेट काढून तिने त्यांना सलाम केला.

कोरोना काळात देशासाठी लढणारे सैनिक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, सफाई कामगार यांना प्रोत्साहन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र रेखाटून रितिकाने त्यांच्या बद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT