0Crimenews_13 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत दारुच्या नशेत निर्दयी तरुणाने चाकू मारला फेकून, कुत्रीला गमवावा लागला जीव

ई सकाळ टीम

औरंगाबाद :  दारुच्या नशेत असलेल्या तरुणाने जवळच असलेल्या कुत्रीवर फेकून मारला. यात कुत्रीला जीव गमवावा लागला. हे कृत्य करणाऱ्या तरुणाचे नाव यश बचके (वय १९) असे आहे. कुत्रीच्या मालकाने त्याच्याविरोधात बुधवारी (ता.नऊ) छावणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाणचक्की परिसरात लहान मुले खेळत होती. यावेळी एका कुटुंबाचे कुत्रेही होते. या दरम्यान यश बचके दारु पिऊन तिथे आला आणि हा चाकू कोणाला मारु असे मुलांना विचारु लागला.

काही वेळातच त्याने चाकू शेजारी बसलेल्या कुत्रीला फेकून मारला. यात तिचा जीव गेला. या घटनेची खेळत असलेल्या मुलांनी ताबडतोब कुत्रीच्या मालकाला सांगितले. या प्रकरणी मालकाने तात्काल छावणी पोलिस ठाणे गाठून सदर तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली. याबाबत समजताच आरोपी फरार झाली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

औरंगाबाद पेट लव्हर्स संघटनाची साथ
आरोपीच्या घरच्या लोकांच्या भीतीमुळे कुत्रीचे मालक तक्रार मागे घेण्याच्या विचार करत होते. मात्र औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या सदस्यांनी साथ देत तक्रार मागे न घेण्याचे सुचविले आहे. मृत कुत्री गरोदर होती, असे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. तरुणावर कलम ४२९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे संघटनेचे अध्यक्षा बेरील सँचिस यांनी माध्यमांना सांगितले. या कलमा अंतर्गत पाळीव प्राण्याचा जीव घेणे, मारहाण करणे, छेडछाड करणे हा गुन्हा असून या अंतर्गत आरोपीला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी

Religious Tourism Bus Service : शिवशाही, आरामदायीमधून पर्यटकांसाठी विशेष बस सेवा, सहलींमध्ये निवास व भोजन व्यवस्था

Gadchiroli: दिल्ली येथे शैक्षणिक सहलीसाठी नागपूर विमानतळावरून प्रस्थान करताना विद्यार्थी.गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे विमानाने 'दिल्ली उड्डाण'; संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला देणार भेट !

SCROLL FOR NEXT