kannad kannad
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : सरणावरच आजीबाई झाल्या जिवंत

दुःखाच्या सागरात बुडालेल्या कुटुंबीयांना या घटनेमुळे सुखद धक्का बसला आहे

संजय जाधव

कन्नड (औरंगाबाद): कन्नड तालुक्यातील अंधानेर (ता.कन्नड) येथील एक ८० वर्षीय महिला चितेवर जिवंत झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजता घडली असून दुःखाच्या सागरात बुडालेल्या कुटुंबीयांना या घटनेमुळे सुखद धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी सरणावरून खाली उतरत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी वृध्देच्या शरीराची हालचाल सुरु असून त्या ब्रेन डेड असल्याचे जाहीर केले.

जिजाबाई गोरे (वय ८०, रा.अंधानेर ता.कन्नड) असे सदर वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड शहरातील माजी नगरसेवक विलास गोरे यांच्या त्या आई असून सोमवारी(ता.२) दुपारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. याबाबत त्यांच्या निधनाची माहिती फोन वरून तसेच सोशल मिडियावरून नातेवाईक, मित्र व गावकऱ्यांना देण्यात आली. त्यांचा अंत्यविधी येथील स्मशानभूमीत रात्री होणार असल्याचाही सर्वांना निरोप देण्यात आला.

यानंतर अंत्यविधीची तयारी करून रात्री ७ ते ८ च्या सुमारास वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंधानेर येथील स्मशानभूमीत रचलेल्या सरणावर सदर वृद्धेचा देह ठेवण्यात आला. तसेच गोवऱ्याही रचण्यात आल्या. शेवटी पाणी पाजून अग्नी देण्याचा विधी सुरु करण्यात आला. तेव्हाच जिजाबाई यांच्या पापण्या हालल्याचे काहींच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित अग्नी देणे थांबविले. त्यानंतर वृद्धेचा हात हलताना अनेकांना दिसला. यावेळी कुटुंबीयांसह नातेवाइकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

त्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाइकांनी त्यांना चितेवरून चक्क खाली उतरविले आणि त्वरित रात्री जवळपास साडेनऊच्या सुमारास कन्नड येथील डॉ.मनोज राठोड यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता त्या धडधडीत जिवंत असून, त्यांचे हृदय सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, त्या ब्रेन डेड असून कोमात गेल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांनी वृद्धेला घरी घेऊन जाण्यास सल्ला दिला. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गोरे कुटुंबीयांच्या घरी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

तारिणी केदारला मनातल्या भावना सांगणार, प्रेमाची कबुली देताच मोठा अनर्थ घडणार, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

IPL Schedule Change: IPL च्या सामन्यांमध्ये होणार मोठी वाढ! पण कधीपासून? अरुण धुमल यांनी जाहीर केलं वर्ष!

Enforcement Directorate: EDची ताकद वाढणार! १२०० पेक्षा जास्त पदांवर होणार भरती, जागांमध्ये मोठी वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT