औरंगाबाद शहरातील गर्दी
औरंगाबाद शहरातील गर्दी 
छत्रपती संभाजीनगर

शंभर दिवसांनंतरही गर्दी, देतेय कोरोनाला वर्दी!

प्रवीण मुके

औरंगाबाद - विनाकारण बाहेर पडू नका, असे पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून कितीही ओरडून सांगितले जात असले तरी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यांवर येत आहेत. बाजारपेठेतही जिकडेतिकडे गर्दीच गर्दी आहे. ही गर्दीच कोरोनाला वर्दी देत आहे. त्यामुळे कोरोनाच्या शंभर दिवसांनतरही शहरात संसर्गाची भितीच राहिली नसल्याचे चित्र आहे. 

ग्रामीण भाग सजग, शहरवासी गाफील
मार्चमध्ये कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर शहरवासीयांना धोक्याची जाणीव झाली. पण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाने कोरोनाला गांभीर्याने घेतले. गावेच्या गावेच सील झाली. बाहेरच्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली. तसेच गावातील नागरिकांनाही बाहेर जाण्यास मज्जाव केला गेला. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना अजूनही नियंत्रणात आहे. शहरवासीयांना मात्र अजूनही या आजाराचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. सुरवातीला प्रशासन सुस्त होते. पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनात समन्वय नव्हता. परिणामी शहरात बाहेर जिल्ह्यातून तसेच परराज्यातूनही लोंढेच्या लोंढे सुखनैव आले. काहींची तपासणी झाली तर काहीजण गुपचूप आले. यातील अनेकजण कोरोना घेऊनच आले होते. शिवाय कडक लॉकडाऊनच्या काळातही गल्ल्यांमध्ये नागरिक रस्त्यांवर येतच होते. सूचनांचे पालन करीत नव्हते. काही क्वारंटाईन बहाद्दर तर पत्ते, कॅरम खेळण्यासाठी बाहेर एकत्र यायचे. अनेकजण व्यायामासाठी फिरायचे. जुन्या शहरात रस्तोरस्ती गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना झपाट्याने पसरला. बळींची संख्याही दीडशेचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. 

अद्यापही गांभीर्य नाहीच 
सध्या शहरातील नवीन वस्तीत लागण झालेल्यांचे आकडे रोजच समोर येत आहेत. एन-1 मधील एका रूग्णापासून सुरवात केलेल्या कोरोनाचे आता तीनशेच्यावर हाॅटस्पाॅट झालेले आहेत. तरी नागरिक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. अनेकजण तर विनामास्क बाहेर पडतात. यात तरूणांचे प्रमाण अधिक आहे. अशा तरूणांमुळे घरातील ज्येष्ठांना कोरोनाला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही या शंभर दिवसात घडल्या. दूध, भाजीच्या नावाखाली दिवसभर बाहेर राहणाऱ्यांची संख्या अजूनही शेकडोंच्या घरात आहे. बाजारपेठेत तर कित्येक ग्राहक विनामास्क येतात, थर्मलगन, आक्सिमीटर लावू देत नाहीत, त्यामुळे दुकानदारही वैतागले आहेत. काही लोकांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच कोरोनाने शहरात पाय रोवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT