विनोद पाटील
विनोद पाटील  
छत्रपती संभाजीनगर

'ईडब्ल्यूएस आरक्षण आर्थिकदृष्ट्या कमकुवत'

प्रकाश बनकर

राज्य सरकारच्या वतीने शासकीय सेवेमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने नोकऱ्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद : ईडब्ल्यूएस आरक्षण (EWS Reservation) देण्याचा न देण्याचा मुळात राज्य सरकारला अधिकारच नाही. आम्हाला मराठा आरक्षण (Maratha Reservation) हवे आहे. त्यातूनच समाजाला न्याय मिळेल. इडब्ल्यूएस आरक्षण आर्थिक दृष्ट्या कमकुवत असून, हे आरक्षण सगळ्या वर्गांसाठी असल्याने यातून मराठा समाजाला न्याय मिळणार नसल्याची भावना मराठा आरक्षण याचिकाकर्ते तथा समन्वयक विनोद पाटील (Maratha Reservation Petitioner Vinod Patil) यांना सोमवारी (ता. ३१) व्यक्त केली. मराठा आरक्षण देण्याबाबत काय पावले उचलणार हे राज्य सरकारने सांगावे अशी मागणीही श्री. पाटील यांनी केली. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी अराखीव उमेदवारांकरिता (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. (EWS Reservation Economically Weak, Vinod Patil Observation)

या विषयी विनोद पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाला पर्याय म्हणून राज्य सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणाचा नवीन मुद्दा समोर आणला आहे. राज्य सरकारच्या वतीने शासकीय सेवेमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने नोकऱ्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. काही जाहिरातींमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नव्हते, अशा विद्यार्थ्यांना त्या जागा मिळतील का? ईडब्ल्यूएसमध्ये जागा देत असताना जे विद्यार्थी ईडब्ल्यूएसमध्ये उत्तीर्ण झाले अशांना काय करणार, मराठा विद्यार्थी व ईडब्ल्यूएस विद्यार्थी एका जागेसाठी पात्र कसे धरणार, हा गुंता वाढणार नाही का, ईडब्ल्यूएस आरक्षण १० टक्के आहे मराठा आरक्षण १३ टक्के होते, उर्वरित ३ टक्के तुम्ही काय करणार?, या मुद्द्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT