amc aurangabad
amc aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

स्मार्ट सिटीतून वगळली जाणार ही कामे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी स्मार्ट वॉटर योजनेअंतर्गत स्मार्ट सिटीतून सुमारे 18 कोटींची कामे केली जाणार होती; मात्र शहरासाठी राज्य शासनाने नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. त्यामुळे ही कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम रखडल्याने त्यावेळी तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जुन्याच पाणीपुरवठा योजनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अभ्यासक म्हणून डॉ. राजेंद्र होलाणी यांची नियुक्ती केली होती. होलाणी यांनी ज्युबली पार्क येथे पाण्याची नवी टाकी बांधणे, नवीन सम्ब, विद्युत पंप, नवीन पाइपलाइन टाकणे, अशी कामे करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यामुळे किमान 10 एमएलडी पाण्याची गळती थांबवून पाण्यात वाढ होईल, असा दावा त्यांनी केला.

या कामांसाठी 10 कोटींचा खर्च अपेक्षित होता; मात्र ज्यावेळी निविदा तयार करण्यात आली तेव्हा कामे 14 कोटी रुपयांवर गेली. या कामात ज्युबली पार्कसह कोटला कॉलनीत टाकी बांधणे, गारखेडा, शिवाजीनगर येथील वितरण व्यवस्था सुधारणेसाठी आवश्‍यक असलेली कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते. 

हे वाचाः पतंगोत्सवात झळकले ठाकरे सरकार, आपले सरकार
 
प्रतिसाद नाही 
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ही कामे स्मार्ट सिटी योजनेतून करण्याचा निर्णय झाला. मात्र, कामांची रक्कम 18 कोटींपर्यंत गेली. या कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या; पण प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, मंगळवारी (ता.14) झालेल्या स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीची बैठकीत याविषयावर चर्चा झाली. त्यावर शासनाने मंजूर केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेत ही कामे होणारच आहेत, त्यामुळे ही कामे स्मार्ट सिटीतून वगळण्याची सूचना करण्यात आली. 

अधिकाऱ्यांचा विरोध, पदाधिकाऱ्यांची धडपड 
नव्या पाणीपुरवठा योजनेत संपूर्ण कामे होणार असल्यामुळे स्मार्ट सिटीतून कामे करण्यास पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा सुरवातीपासूनच विरोध होता; मात्र पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे, तोपर्यंत ही कामे करण्यात यावीत, असे सांगत पदाधिकाऱ्यांची धडपड सुरू होती. तत्कालीन आयुक्तही कामे करण्याच्या बाजूने होते. मात्र आता आयुक्तही बदलले आहेत. त्यामुळे कामे स्मार्ट सिटीतून वगळण्यात आली आहेत. एमएसआय, सफारी पार्कसाठी निधी वाढविण्यात आल्याने निधीची कमरतता निर्माण झाल्याचे कारणही यासाठी सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT