fake notes is back 2 lakh fake notes seized police action accused arrested Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : बनावट नोटांचे भूत पुन्हा मानगुटीवर; दोन लाखांच्या बनावट नोटा शहरात जप्त

सिटी चौक पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने दोन लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली. शहागंज परिसरात सात मार्चला ही कारवाई शहागंज भागात करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

शहागंज : सिटी चौक पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने दोन लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली. शहागंज परिसरात सात मार्चला ही कारवाई शहागंज भागात करण्यात आली.

संतोष विश्राम सिरसाठ (वय ४९, रा. राजीवनगर, जहागीरदार कॉलनी, रेल्वेस्टेशन) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, तपासादरम्यान आरोपीवर अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रकार समोर आल्यामुळे सखोल तपास करण्यात येत आहे.

सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात मार्चला पीएसआय अर्जुन कदम हे पथकासह शहागंज हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एक व्यक्ती बनावट नोटा चलनात वापर करण्यासाठी आणणार असल्याची माहिती कदम यांना मिळाली होती.

त्या आधारे कदम यांनी पथकासह शहागंज परिसरात सापळा रचून रस्त्याने लाल रंगाची पिशवी घेऊन जाणाऱ्या संतोष सिरसाठ याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीत ५०० रुपये किमतीच्या तब्बल ४०० नोटा सापडल्या. बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्या तपासल्या असता नोटा बनावट असल्याचे समोर आले.

याप्रकरणी जमादार आनंद वाहूळ यांच्या तक्रारीवरून आरोपी संतोष शिरसाठविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, प्रशांत स्वामी, एसीपी संपत शिंदे, महेंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अर्जुन कदम, प्रशांत मुंडे, सुरेश बोडखे, आनंद वाहूळ, अन्वेज शेख, प्रवीण टेकले, बबन ईप्पर यांनी केली.

जामिनावर सुटलेला असताना प्रकार

संशयित आरोपी संतोष विश्राम सिरसाठ याच्यावर यापूर्वी देखील बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याला दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने पुंडलिकनगर भागात बनावट नोटांसहित अटक केली होती. हा गुन्हा सध्या न्यायप्रविष्ट असून शिरसाठ जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संशय आल्याने निवडले शहागंज

संशयित आरोपी हा बनावट नोटा घेऊन पूर्वी मिलकॉर्नरला येणार होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, आरोपीला संशय आल्याने त्याने मिलकॉर्नरऐवजी शहागंज परिसर निवडला. ही बाब खबऱ्याला कळताच त्याने उपनिरीक्षक कदम यांना ही माहिती दिली. त्यानुसार कदम यांनी शहागंज येथील समृद्धी फॅमिली हाउस ऑफ प्लॅस्टिक शॉपसमोर सायंकाळी सव्वासात वाजता सापळा रचून बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेला संतोष सिरसाठला अटक केली.

रॅकेट असण्याची शक्यता

आरोपीकडून पोलिसांनी दोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात बनवाट नोटा जप्‍त करण्यात आल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. याप्रकरणी आरोपीने या नोटा कुठून आणल्या, याची सखोल चौकशी सुरू असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.

१४ मार्चपर्यंत कोठडी

संशयित आरोपी सिरसाठ याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याने बनावट नोटा स्वतः तयार केल्या की, त्या नोटा कोणाकडून घेतल्या? बनावट नोटा विक्री करणार होता की, त्याचा दुसरा उद्देश होता?

त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्हे केले आहेत, याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करीत आरोपी शिरसाठला १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT