तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : शेतातील केशर आंब्याची बाग. 
छत्रपती संभाजीनगर

आंब्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा, चार कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळाले उत्पन्न

दरवर्षी वैशाख महिन्याच्या सुरवातीस म्हणजेच अक्षय तृतीयेस सुरू होणारा आंब्यांचा हंगाम यंदा महिनाभरापासून सुरू झालेला आहे.

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तालुक्यात (Tuljapur) आंबा उत्पादक शेतकऱ्यांना (Mangao) यंदा मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्‍पन्न मिळाले आहे. आंब्यामुळे उलाढालीतही मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील आंबा उत्पादकांना (Mango Producers) सुमारे चार कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण, यंदा वादळी पाऊस (Rain), लॉकडाउन (Lock Down) याचाही फटका बसला आहे. या गोष्टी नसत्या तर यामध्ये आणखी काही कोटींनी वाढ झाली असती. तालुक्यात १९९२ पासून लागवड झालेल्या केशर आंब्याच्या (Kesar Mango) लागवडीमुळे आंबा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी झालेल्या मुबलक पावसाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. (Farmers Get Above Four Crores Profit Through Mango Selling In Tuljapur)

दरवर्षी वैशाख महिन्याच्या सुरवातीस म्हणजेच अक्षय तृतीयेस (Akshay Tritiya) सुरू होणारा आंब्यांचा हंगाम यंदा महिनाभरापासून सुरू झालेला आहे. ग्रामीण भागातील सुमारे दोनशे ते अडीचशे शेतकरी शहरात आंबा विक्रीसाठी येतात; तसेच सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांचा आंबा मुंबई (Mumbai), हैदराबादसह (Hyderabad) अन्य शहरांमध्येही विक्रीसाठी गेलेला आहे. काही शेतकऱ्यांचे आंबे परदेशात गेले आहेत. सुरवातीला केशर आंबा १५० रुपये दराने विक्री झाला होता. त्याचा भाव मागील आठ दिवसांपूर्वी ९० रुपये प्रती किलो आणि १४ मे रोजी साठ रुपये प्रति किलो दराने विकला गेला. वर्ष १९९२ च्या सुरवातीला आंब्याचे प्रति एकरी ४० रोपे लावली जात होती; मात्र आता शेतकऱ्यांनी सुमारे सहा फुटांवर आंब्याची झाडे लावण्यास सुरवात केली आहे. पूर्वी बांधावर लागवड केली जात असलेली आंब्याची झाडे लावणे आता कमी झाले आहे. तथापि अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागा लागवड केलेल्या आहेत. जुनी झाडे कमी होण्याच्या मार्गावर असून संकरित वाण लावण्यावर शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. यात अनेक चांगल्या जाती नामशेष होण्याची भीती आहे.

मागील २५ वर्षांपासून आजपर्यंत लागवड झालेल्या आंबा बागेचे तालुक्यातील क्षेत्र साधारणपणे ८२६ हेक्टर आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन केले जाते.

- नामदेव गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर.

यंदा आंबा उत्पादकांसाठी वर्ष चांगले आहे. साधारणपणे तीन एकर क्षेत्रातील आंब्याची बाग सव्वाचार लाख रुपये किमतीस गेली आहे. एकूणच यंदा आंब्याचे उत्पादन शेतकऱ्यांना परवडले आहे.

- दिलीप खपले, आंबा उत्पादक, सिंदफळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Suraj Wife: ही आहे सुरज चव्हाणची होणारी बायको! अंकिताने खास पद्धतीने दोघांचं केलं केळवण, सुरजचा उखाणा एकदा ऐका! Viral Video

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

SCROLL FOR NEXT